SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी.
महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण विकास करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा तत्काळ निधी मंजूर करण्यांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
सातारा जिल्ह्यांचे सुपुत्र असलेले शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा आलेल्या खाजगी आणि विश्रांतीसाठी आलेल्या आणि महाबळेश्वर दौऱ्यानिमिंत्त त्यांनी जिल्ह्यांतील विविध विकास कामाचा आढावा घेण्यासांठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जिल्ह्यांच्या विकासांचे अनेक प्रस्ताव मंत्रालय स्तरांवर प्रलंबित असल्यांचे त्यांच्या निदर्शनांस आले या प्रस्तावांची एकत्रित यादी करुन घ्यावी हे प्रस्ताव संबंधित विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्काळ मार्गी लावले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले त्याचबरोबर जिल्ह्यांतील विकास कामे पूर्ण करण्यासांठी प्राप्त झालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनांला दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल, वाई उपविभागांचे पोलीस अधिकारी सौ.शितल जानवे खराडे मॅडम यांच्यासह जिल्ह्यांतील सर्व विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थिंत होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली