SANGLI : सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचा संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा दौरा...
SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आयर्विन पुलाजवळ नदीपातळीची पाहणी करून महापालिकेला दक्षता घेण्याच्या दिल्या सूचना...
दि. 11 जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी कृष्णा नदीची आयर्विन पुलाजवळ वाढत असलेल्या पाणी पातळीची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिक व सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे , नकुल जकाते महानगरपालिका अधिकारी यांना सदर ठिकाणी नागरिकांसाठी स्थलांतरित ठिकाणे, निवारा व्यवस्था , स्वच्छता ठेवणे योग्य त्या उपाययोजना करणेबाबत व दक्ष राहणेचे सूचना दिल्या आहेत
या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वारणा धरणाला भेट देऊन पाहणी केली
दि. 11: शिराळा तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वारणा धरण येथे भेट देऊन पाहणी केली. धरण क्षेत्रातून करण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत, धरणातील पाणी पातळी, पर्जन्यमान, अतिवृष्टी कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, वारणा उपअभियंता मिलिंद किटवाडकर, शिराळा वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे सोबत उपस्थित होते.
दरम्यान कोयना धरणाच्या पाण्याच्या विसर्ग विषयी महत्त्वाचे अपडेट येतेय .....
महत्वाची सूचना
कोयना धरण
आज दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्या. 5:00 वाजता धरणाची पाणी पातळी 2147 फूट 00 इंच झाली असून धरणामध्ये 85.21 TMC (80.97%) पाणीसाठा झाला आहे.
मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.75 TMC इतकी वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. *पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई , सांगली