SANGLI
लोकसंदेश तासगाव प्रतिनिधी
सांगली : रोहित पाटलांची भाजपवर पुन्हा एकदा सरशी ; खासदार संजयकाकांच्या पॅनलचं डिपॉझिट गुल...
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर. आर. पाटील हे राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले असून त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. रोहित पाटील यांनी दिग्गज नेते आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केली आहे . याआधी रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीतही विरोधकांना धुळ चारली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पाटील यांना बळ दिलं जात आहे आर.आर. पाटलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न रोहीत पाटील करत आहेत. रोहित यांची प्रचार करण्याची पद्धत ग्रामीण मतदारांना व तरुण वर्गाला साद घालत असून त्यामुळे त्यांना यशही मिळताना दिसत आहे.
सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायत....
निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज पार पडली. निवडणुकीत ३ प्रभागांमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र रोहित पाटील यांनी गावकऱ्यांना साद घातल ग्रामपंचायतीत विजय मिळवला. या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्या पॅनलमधील सदस्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली