पेठ - सांगली रस्त्याचा डी.पी.आर. मंजूर दिवाळी नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात :आमदार सुधीरदादा गाडगीळ
SANGLI
लोकसंदेश जिल्हा प्रतिनिधी.
सांगली ५ ऑगस्ट २०२२:- सांगली शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा दुवा असलेला सांगली ते पेठ नाका या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ या कामाचा डीपीआर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे.
दिवाळी नंतर या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. २०१६ पासून या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा सुरु होता.
पुणे बेंगलोर महामार्गापासून सांगली शहर व तिथून पुढे मिरज मार्गे सोलापूर कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच कर्नाटक कडे जाणारा राज्य मार्ग यांना जोडणारा आणि सांगली जिल्ह्यातील महत्वाचा हा रस्ता आहे.
पेठ नाका ते सांगली वाडी दरम्यानच्या ४१ किमी लांबीचे काँक्रीटीकरण तसेच या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी आवश्यकता होती. तसेच पेठ नाका सांगली मिरज रस्त्याच्या सांगली वाडी टोलनाका मिरज या १४ किमी रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी हि पाठपुरावा सुरु आहे. या कामाचा हि डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सागंली पेठ रस्त्याच्या ९४५ कोटींच्या डीपीआर ला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. आपण केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले.
दिवाळीनंतर या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन सांगली शहराचा खुंटलेला विकास पुन्हा वेगाने सुरु होईललोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
व सांगली शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागास या महामार्गामुळे खूप मोठा लाभ होणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून विविध उद्योग धंद्यात वाढ होईल असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला...