SANGLI :
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली महापालिकेतील बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी दिले प्रशासनाला आदेश : परवाना शुल्क सवलतीबद्दल गणेश मंडळांनी मानले प्रशासनाचे आभार
गणेश मंडळांना स्टेज आकारणी शुल्कात सवलत : 10 रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे एकदाच भरावे लागणार
शुल्क : तर प्रति खड्डा 50 रुपयाप्रमाणे आकारणी होणार : गणेश आगमनापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होणार :
सांगली : कोरोना काळानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होत असणाऱ्या गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. यावेळी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत गणेश मंडळ आणि नगरसेवक पदाधिकारी यांच्या विनंतीवरून गणेश मंडळांकडून प्रतिदिन आकारणी करण्यात येणाऱ्या फीमध्ये सवलत देत प्रति चौरस मीटर 10 रुपये आणि प्रति खड्डा 50 रुपये प्रमाणे एकदाच आकारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत महापौर दिग्विजय सुर्यवंशी , आयुक्त सुनील पवार यांनी घेतला. महापालिकेच्या यक निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून मनपक प्रशासनाचे गणेश मंडळाकडून आभार मानण्यात आले.
31 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा आज महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. बैठकीस स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत सांगली शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते.
प्रारंभी महापालिकेकडून गणेशोत्सवबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी सर्वाना दिली. तसेच मंडप स्टेज उभारणी तसेच स्वागत कमान उभारणी बाबत महापालिकेने विकसित केलेल्या ऍपची माहितीही सर्वाना देत परवानगी प्रक्रिया सांगण्यात आली.
यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार म्हणाले की, यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने या उत्सवासाठी महापालिका प्रशासनाने सुद्धा तयारी केली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करण्याबरोबर विसर्जन मार्गबाबत सर्व ती व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 13 ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच निर्माल्य संकलन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत याचबरोबर श्री आगमन आणि विसर्जन मार्गावर एलईडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याबाबत वीज मंडळाला नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मिरवणूक मार्गावर रस्त्यावर धोकादायक स्थितीत असलेली झाडांच्या फांद्या काढून घेणेची कारवाही सुरू करण्यात आली आहे. सांगलीच्या सरकारी घाटावर मूर्तीदान केंद उभारण्यात येणार असून यामध्ये मूर्तीदान करणाऱ्या नागरिकांना मनपाकडून प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात येणार आहे.
दीड दिवसाच्या विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनपाकडून स्वच्छ सर्व्हेक्षणबाबत तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी पर्यावरण पूरक आणि आनंदी वातावरणात साजरा करावा तसेच कोरोना नियमांचेही सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले.
महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गणेश मंडळ आणि नगरसेवक यांच्या मागणी आणि विनंतीनुसार मंडप स्टेज परवाना आकारणी शुल्कात सवलत देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच सर्वांनी महापालिकेच्या गणेशोत्सव परवानगी ऍपचा वापर करून सुलभतेने परवानगी उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन ही महापौर सुर्यवंशी यांनी केले. या बैठकीस विश्रामबाग पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी, वाहतूक शाखेच्या प्रज्ञा देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. सुतार, यांच्या सह विजमंडळाचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांच्यासह नगरसेवक युवराज बावडेकर, विष्णू माने, लक्ष्मण नवलाई, उत्तम साखळकर, फिरोजपठाण, गजाननआलदर, नगरसेविका वर्षा निंबाळकर, अप्सरा वायदंडे, लक्ष्मी सरगर यांच्यासह अधिकारी , गणेश मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली