SANGLI
लोकसंदेश कडेगांव प्रतिनिधी
चार वर्षापासून थकीत ऊस बिल मिळावे यासाठी कडेगांव तहसीलदार कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला थकीत ऊस बिल तातडीने द्या अन्यथा धुराडे पेटू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला ...
कारखाना सद्या एनसी एल टी कोर्टाच्या ताब्यात आहे या कारखान्याचा ताबा येत्या दीड महिन्यात आम्हाला मिळेल ताबा मिळाल्या मिळाल्या तातडीने सर्व पैसे शेतकऱ्यांना देवू अशी ग्वाही पृथ्वीराज देशमुख व सुरेंद्र चौगुले यांनी दिली
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा प्रारंभ गेस्ट हाऊस पासून झाला एकच गट्टी राजू शेट्टी. शेतकऱ्याच्या साठी एकच वाव महेश भाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, उस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, घामाचे दाम मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा मुख्य चौकातून तहसीलदार कार्यालया समोर आला त्या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले
या यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले गेल्या चार वर्षांपासून केन अग्रॉ कारखान्याने चार वर्षापासून ऊस बिले दिलेली नाहीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे ऊस बिल तातडीने मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे या कारखान्यावर ३५० ते ४०० कोटी चे जिल्हा मध्यवर्ती अन्य बँकेचे कर्ज आहे त्यामुळे हा कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतला आहे बँक आणि अन् सी एल टी व कारखाना असा वाद न्यायालयात सुरू आहे या वादाच्या निकालानंतर च बिल मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असला तरी तातडीने बिले मिळाली पाहिजेत यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे प्रसंगी आम्ही गनिमी काव्याने बंगल्यात घुसू असा इशारा देत आहोत त्याच बरोबर यंदा त्यांना गळीत हंगाम सुरू करावयाचा आहे गळीत हंगामाचे धुराडे आम्ही बिले मिळाल्याशिवाय पेटू देणार नाही शेतकऱ्यांनी राजकारणा पेक्षा अर्थकारणाला महत्व दिले पाहिजे राजकारणाचा किडा जास्त वळवळू देवू नका राजकारणाच्या वेळी राजकारण करा पण जिथे तुमचे आर्थिक हित आहे तिथे तरी संघटित होवून संघटनेबरोबर या असेही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी अनिल पवार म्हणाले ; शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे संघतनेशिवय शेतकऱ्यांना पर्याय नाही यापुढे आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करू यावेळी तानाजी देशमुख भागवत जाधव राजेन्द् माने यांनी मार्गदर्शन केले या मोर्चाला बाळासाहेब जाधव अजमुद्दिन मुजावर आनंद जंगम धनाजी माळी तानाजी धनवडे अमित रावताळे दत्तू अण्णा घारगे सचिन पवार विजय रेंदालकर अनिल पाटील महादेव पवार धोंडीराम पाटील सिकंदर शिकलगार निशिकांत पोतदार प्रदीप लाड विनायक पवार गोरख महाडिक गुलाब यादव भुजंग पाटील राजेंद्र पाटील प्रमोद शेटे संदीप शिरोटे पंढरीनाथ जाधव जालिंदर जाधव बंडा पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली