राज्यस्तरीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये
सांगली जिल्ह्यातील चौघांना कांस्यपदक
सांगली : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडलेल्या 19 व्या राज्यस्तरीय सिलंबम (लाठीकाठी) चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील चौथा खेळाडूंनी कांस्यपदक पटकावून जिल्ह्याला प्रथमच या स्पर्धेत यश मिळवून दिले आहे.
अनुरूप विनोद चौगुले, आयुष धीरज आवटे, वर्धन श्रीकांत बेले आणि राजवर्धन सचिन देसाई अशी विविध गटात कांस्यपदक मिळवलेल्या चौघा खेळाडूंची नावे आहेत. राज्यभरातून 340 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ०६ आणि ०७ ऑगस्ट असे दोन दिवस या स्पर्धा चालल्या. स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष संपतराव व्हनमाने यांच्या हस्ते आणि शिर्डीतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते.
सांगली जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्ह्याच्या शिलंबम खेळाच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंनी असे घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे साहाय्य तर सांगली जिल्हा सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष मनी गौडा सर आणि सचिव योगाचार्य अमेय पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून होत आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली