SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील प्रमोद उगारे टोळी तडीपार
तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रमोद उगारे टोळीस मा. श्री दिक्षीत गेडाम पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्हयातून १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
तासगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख ९) प्रमोद रामचंद्र उगारे, वय २५ वर्षे, रा.सावळज ता. तासगांव, व इतर टोळी सदस्य २) बाबू ऊर्फ प्रमोद वसंत माने ऊर्फ गरड, वय - ३० वर्षे, रा. सावळज ता. तासगांव. ३) विशाल ऊर्फ कृष्णा सिद्धू उणवणे, वय २२ वर्षे, रा. सावळज ता. तासगांव. या टोळीविरुद्ध सन २०१४ ते २०२२ मध्ये तासगांव, कवठेमहांकाळ व सांगोला पा. ठाणे जि. सोलापूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न, चोरुन वाळूची वाहतुक करणे, गर्दीमारामारी, घातक शस्त्राद्वारे इच्छापूर्वक दुखापत, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करणे, दुखापत व हमला करण्याचे पुर्वतयारीने गृह अतिक्रमण करणे असे शरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे ०९ गुन्हे दाखल आहेत. हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, तासगांव पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी अविनी शेंडगे, उपविभागिय पोलीस अधिकारी, तासगांव यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) प्रमोद रामचंद्र उगारे, वय २५ वर्षे, रा. सावळज ता.तासगांव व इतर टोळी सद्र) बाबू ऊर्फ प्रमोद वसंत माने ऊर्फ गरड, वय ३० वर्षे, रा. सावळज ता. तासगांव. ३) विशाल ऊर्फ कृष्णा सिद्धू उणठणे, वय २२ वर्षे, रा. सावळज ता. तासगांव यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्हयातुन १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक, श्री. दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा सांगली, पोनि संजीव झाडे, तासगांव पोलीस ठाणे, सपोफी / सिध्दाप्पा रुपनर, पोहेकॉ संजय पाटील, पोकों/ दिपक गट्टे स्था.गु.अ. शाखा सांगली, तसेच पोना / विलास मोहिते, पोकों/हणमंत गवळी तासगांव पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली