SANGLI : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना...



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना...

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना झालीय. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत. 


 भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन्‌ गेला याचा गणपती भक्‍त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला "चोर गणपती' म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.



 गणेशचतुर्थीच्या आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी रंगरगोटीशिवाय मूर्तीना हात लावला जात नाही. गणपती मंदिरातील
गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.


कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मागील 3 वर्षांमध्ये साध्या पध्दतीने गणपती पंचायतन संस्थान कडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे.यासाठी मंदिर , मुख्य गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली