SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर येथील खुनाबद्दल तिघांना जन्मठेप पूर्ववैमनस्यातून वर्षांपूर्वी केला होता निर्घृण खून
खुनप्रकरणी तिघांना जन्मठेप : प्रत्येकी दहा हजार रूपये दंड .
पूर्ववैमनस्यातून अहिल्यानगर येथे संजय भाट याचा खून केल्याबद्दल आरोपी अशोक वसंत पाटील (वय ३५) प्रकाश उर्फआण्णा बाबा गवळी (वय २६) अमित प्रकाश कांबळे (वय २७ सर्व रा. अहिल्यानगर) यांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी खटला चालवला.
हकीकत अशी की, आरोपी अशोक पाटील यांची पत्नी व मृत संजय भाट यांच्यात संबंध असल्याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी १० वर्षांपूर्वी पाटीलने दिली. त्यावेळी ते प्रकरण आरोपीने एक लाख रुपये घेवून प्रकरण मिटवले तेव्हापासून दोघे ही एकमेकांशी बोलत नव्हते. संजय भाट याचा मित्र सुनिल कोळेकर याच्या वाढदिवसानिमित दिवाळीत अहिल्यानगर चौकात मोठे डिजिटल पोस्टर लावते होते. त्यावर संजय भाट याचा फोटो होता. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी संजय भाट याच्या फोटोत गळयाभोवती ब्लेडने फाडण्यात आले आरोपी अशोक पाटील यानेच पोस्टर फाडले या कारणावरुन दुपारी भाट व अशोक पाटील यांच्यात भांडण झाले होते त्याच दिवशी रात्री ८ च्या सुमारास भाट व त्याचा मित्र विजय शिंदे दुचाकीवरून आहिल्यानगर येथील शेंडगे किराणा दुकानाजवळ आले तेव्हा तेथे आलेल्या तिघा आरोपींनी दुचाकीवरून भाट ला खाली पाडून डोक्यात, मानेवर व शरीरावर २४ ठिकाणी तलवार कोयता, गुप्ती, जांबियाने वार केले.
हल्ल्यानंतर भाटच्या बहिणीचा पती संजयकुमार पाटील घटनास्थळी आला त्याने जखमी भाट याना रिक्षामध्ये घालून सिव्हील हॉस्पीटलमध्ये नेत असताना भाट याला संजयकुमार रिक्षामधील शकील मुल्ला यांच्यासमोरच परत आरोपीनी तलवार कोयता जांबीया व गुप्तीने वार केल्याची वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर ते सिव्हील हॉस्पीटल पोहोचले असता भाट मृत झाला .प्रकरणी जयकुमार पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
न्यायालयात सुनावी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजय शिंदे व अनिल आवटी यांची साक्ष महत्वाची ठरली फिर्याद जयकुमार पाटील व शकील मुल्ला यांच्यासमोर झालेला मृत्यूपूर्व जबाब हा महत्वाचा ठरला.
या खटल्याचा निकाल लागल्यानंतर या भागातील नागरिक व नगरसेवक विजय घाडगे यांनी सरकारी वकील रियाज जमादार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, ही केस फार महत्त्वाची गुंतागुंतीची असल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण सांगलीतून लक्ष लागून राहिले होते
सिव्हील हॉस्पीटलचे डॉ. पंकज वरपे व पंच अनिल पाटील यांचीही साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपींना जन्मची शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस निरीक्षक ए.ए. भवड उपनिरीक्षक बी.सी. गोसावी, हवालदार अशोक कोळी यांनी तपास केला. पैरवी कक्षातील पोलिस कर्मचारी शरद राडे, वंदना मिसाळ, आदीचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली