SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थूलता कमी करण्या विषयीचे जागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार.- डॉक्टर जगन्नाथ दीक्षित.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच आमचे गुरु डॉक्टर श्रीकांत जिचकर यांची 14 सप्टेंबर रोजी असणारी जयंती यांचे औचित्य साधून ADORE TruST मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्याकरता जीवनशैलीच्या बदलाबाबत तसेच स्थूलता निवारण जागृत मोहिमेस 15 ऑगस्ट पासून पुण्यात आरंभ झाला.
बालपणातील लठ्ठपणा ही एक प्रमुख समस्या बनत आहे, विशेषतः शहरी भागामध्ये. 8-9-10 इयत्तेच्या विद्यार्थ्यांना आमच्या साध्या जीवनशैलीतील बदलाबद्दल शिक्षित करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी जागरूकता मोहीम सुरू केली होती. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे ती विस्कळीत झाला होती. हा उपक्रम आम्ही १५ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करत आहोत.
सांगली जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून त्याचा प्रारंभ आज 22 ऑगस्ट 2022 रोजी एमटीएस प्रशाला, कांतीलाल पुरुषोत्तम शहा प्रशाला, तसेच पटवर्धन हायस्कूल या शाळांमधून सुरू झाला आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आहार तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर स्वतः तसेच त्यांचे सहकारी श्री श्री संजय मोरे व श्री बोकील हे मार्गदर्शन करणार आहेत . सांगली जिल्ह्यातील मोहिमेस पुढे सुरू ठेवण्यासाठी सांगली येथील DRC सेंटर चे प्रमुख श्रीरंग केळकर ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली