SANGLI
सांगली ही कलाकारांची नगरी अनादीकाला पासून येथे नसानसात व रगारगात कलाकारी विसावली आहे....
आणि ती जगविख्यात आहे..
भारतात जो काही चित्रपट, भक्ती संगीत , भाव संगीत असो अथवा कोणतीही कलाकारी असो.. त्याचा प्रवास झाला आहे त्याचा उगम निश्चितपणे सांगली मधूनच झालेला आहे .... मग ते भावे असतील, खाडीलकर असतील, बालगंधर्व असतील , मास्टर अविनाश असतील, पी बाबासाब, किंवा लता मंगेशकर कुटुंब असतील, किंवा आत्ताचे सई ताम्हणकर,व अशा बऱ्याच कलाकारांनी जगाला कलाकारीची ओळख सांगलीनेच दिली आहे..
अशा या बहुगुणी सांगलीमध्ये फिरोजखान जमादार ग्रुपने सर्व कलाकारांना एकत्रित करत गेली पाच वर्षे झाली सांगलीकरांना संगीताची मेजवानी देण्याचा वसा घेतला आहे... सांगलीकरांच्यासाठी स्वखर्चाने ते हे कार्य निरंतर करत असतात...
सांगलीतील गुप्त व लुप्त झालेल्या कलाकारांना स्टेजवर आणून त्यांच्या कलेची ओळख करून देण्यात फिरोज भाई आणि ग्रुपचा याचा फार मोठा वाटा आहे...
काल जगविख्यात गायक मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी त्याचच औचित्य साधत रविवारी सांगलीतील भावे नाट्य मंदिर मध्ये "गीत संगीताचा कार्यक्रम सुर संगम" ने सादर केला
अक्षरशः प्रेक्षकांना उभे राहण्यास सुद्धा नाट्यगृहामध्ये जागा नव्हती असा गर्दीचा कार्यक्रम लोकांनी अनुभवला..
या कार्यक्रमामधून सुर संगम च्या सर्व टीमने रफिक साहेबांना आदरांजली वाहत मोहम्मद रफिक साहेबांनी गायलेली सर्व श्रमणीय गीते सुरसंगम टीम व त्यांच्या संगीत कलाकारानी अस्मरणीय पद्धतीने सादर केली
फिरोजखान जमादार ग्रुपचे रमाकांत घोडके, विक्की चड्डा, दिलावर भाई एम असिफ, सह शैलजा माळगे,मीरा शिंदे, रेश्मा पोतदार ,कौसर मुजावर व रमाताई नागवेकर यांनी आपल्या श्रवणीय गीतातून सादरीकरण करत सांगलीकरांना मंत्रमुग्ध केलं ..
या कार्यक्रमात ही सर्व गीते श्रवणीय करण्यासाठी वाद्य वृंद कलाकारांचा फार मोठ योगदान या कार्यक्रमास लाभल ...
या कार्यक्रमाची सर्व धुरा ॲड. रियाज जमादार व फैयाज नरवाडे यांनी आपल्या निवेदनातून मिमिक्री करीत सांभाळली
या कार्यक्रमासाठी फिरोजभाई व झाकीर जमादार यांनी अखंड परिश्रम घेत आहेत या सुरसंगम टीम कालचा कार्यक्रम पाहिल्यानंतर ही टीम मोठ्या मोठ्या कलाकारांसह मुंबईच्या "षण्मुखानंद हॉल"मध्ये आपला कार्यक्रम निश्चितपणे सादर करतील याची आम्ही सांगलीकर म्हणून खात्री देत आहोत...
या कार्यक्रमासाठी उत्तम व चांगला प्रायोजक जर लाभला तर... हा कार्यक्रम जगविख्यात होऊ शकतो...
सांगलीकरांच्या संगीत नंदनवनामध्ये या कार्यक्रमाचा आस्वाद सर्व सांगलीकरांनी घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख व त्यांच्या सर्व ग्रूपला लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड व आमच्या सर्व टीम कडून भावी कार्यास आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....
संपादक ; सलीमभाई नदाफ, लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
या कार्यक्रमासाठी संपर्क साधा...