सांगली : प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे १८ वे आयुक्त म्हणून सुनील पवार यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी चांगल्या संकल्पनांना बळ देऊ. यासाठी माध्यमांचे पाठबळ महत्वाचे आहे, असे मत पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज प्रायव्हेट लिमिटेड चे संपादक सलीम नदाफ, हॅलो प्रभातचे संपादक गणेश पाटील, दैनिक केसरीचे संजय हेब्बाळकर, लोकसत्ताचे दादासो बंडगर, तरुणभारतचे विक्रम चव्हाण, पुढारीचे उद्धव पाटील, दैनिक वाळवा क्रांतीचे विजय हुपरीकर, अमर चोपडे आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली