सांगलीच्या पुरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती ....
SANGLI:
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
गेल्या चार दिवसापासून सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यामध्ये पावसाची सतंतधार चालू असल्याने आजूबाजूची कोयना सह सर्व धरणे भरलेली आहेत.
त्यामुळे कोयना धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे
सांगली जिल्ह्यातील बुर्ली, अमनापुर, भिलवडी, हरिपूर, व आजूबाजूच्या नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्क केले जात आहे
सांगली शहरांमध्ये आयुर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 27 च्या दरम्यान झालेली आहे , नदीच्या पाण्याची पातळी उद्यापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने सांगली पुरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबतीत जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पुरपट्ट्यात मनपाकडून खबरदारीबाबत प्रबोधन केले जात आहे.
सध्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाकडून नदी काठच्या वस्त्यांना तसेच आस्थापनाना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.
आज महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक आयुक्त नितीन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकाती विजय पवार, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी सुद्धा महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थलांतर करण्याची तयारी दर्शविली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली