RAYGAD:
लोकसंदेश प्रतिनिधी शाम लोखंडे
लायन्स क्लब कोलाड रोहाच्या अध्यक्षपदी डॉ. सागर सानप यांची फेरनिवड.
गेली वर्षभर समाज सेवेशी संघटीत असलेल्या लायन्स क्लब कोलाड रोहाच्या अध्यक्षपदी डॉ सागर सानप यांची फेरनिवड झाली आहे. अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पुगाव येथील नम्रता गार्डन येथे संपन्न झालेल्या सभेत पुनश्च सर्वानुमते डॉ सागर सानप आणि त्यांच्या कार्यकारिणी तील सहका-यांनी लायन्सक्लब चे जिल्हा प्रांतपाल एम जे एफ लायन मुकेश तनेजा यांनी शपथ दिली. यावेळी लायन्स च्या डिस्ट्रीक्टचे सी एस आर लायन एन आर परमेश्वरन यांनी लायन्स क्लब कोलाड रोहा चे सभासदत्व घेतलेल्या विठ्ठल सावळे,शोभा खांडेकर,सपना गांधी,स्वरा महाडिक यांना सभासदत्व दिले.
तद्नंतर पुन्हा फेरनिवड करण्यात आलेले अध्यक्ष डॉ.सागर सानप यांनी आगामी काळात कोलाड येथे डॉ गांधी नर्सिंग होम हॉस्पिटल या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ तुर्भे व लायन हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुसज्ज असे व्हिजन सेंटर अथवा नेत्र तपासणी केंद्र यांच्या वतीने उभे करण्याचा मानस असल्याचे सांगत कोलाड विभाग मोतीबिंदू मुक्त व लायन्स क्लब रोहा च्या सहकार्यातून रोहा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.
यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष- नरेश बिरगावले, डॉ मंगेश सानप, डॉ विनोद गांधी,सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, सहसेक्रेटरी-अनिल महाडिक, खजिनदार- डॉ श्याम लोखंडे, सहखजिनदार- नंदकुमार कळमकर, बोर्ड ऑफ डायरेक्टर ला.गजानन बामणे,माधव आग्री,विजय गोतमारे,अलंकार खांडेकर,राजेंदर कोप्पू,टेल ट्विस्टर सौ पूजा लोखंडे,टेमर दिनकर सानप,सर्व्हिस चेअरपर्सन महेश तुपकर,मेंबरशीप चेअरपर्सन नितेश शिंदे,साईट फस्ट ऑफिसर विठ्ठल सावळे,एल सी आय एफ कॉर्डनेटर सौ दीपाली आग्री,पी आर ओ विश्वास निकम,मार्केटिंग चेअरपर्सन कल्पेश माने ,तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून भरत महाडिक,गणेश बागुल,सौ विना धसाडे,सौ शोभा खांडेकर,सौ स्वरा महाडीक, सौ माधवी सानप,यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ लायन मुकेश तनेजा यांनी पदाची शपथ ग्रहण दिली .
यावेळी विचार मंचावर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ लायन मुकेश तनेजा,डिस्ट्रिक्ट सीएसआर लायन एन आर परमेश्वरम, प्रदीप सिनकर,झोन चेअरपर्सन नुरुद्दीन रोहावाला,रोहा लायन्स क्लब अध्यक्ष अब्बास रोहावाला,प्रमुख मान्यवर व आदी लायन सदस्य उपस्थित होते.अध्यक्ष डॉ सागर सानप यांनी प्रास्ताविक करताना मागील वर्षातील कामाचा आढावा घेतला. तर लायन गजानन बामणे व लायन नरेश बिरगावले यांनी डिस्ट्रिक्ट गव्हनर्र व लायन एन आर परमेश्वरम यांची ओळख परीट करून दिली .तर एन आर परमेश्वरम यांनी सांगितले की नव्याने स्थापन करण्यात आलेला कोलाड रोहा लायन्स क्लब हा ग्रामीण भागात उत्तमरीत्या काम करत आहे तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुकेश तनेजा यांनी उपस्थित लायन सदस्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की मागील वर्षी मी व्हाईस प्रेसिडन्ट म्हणून आलो होतो परंतु आज मी गव्हर्नर म्हणून तुमच्या कार्यक्रमाला पुन्हा येण्याचं भाग्य लाभलं आणि आलो याचा आनंद व्यक्त केला त्याच बरोबर गेली वर्षभरात कोलाड क्लबनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण व विविध कामांचा उल्लेख या यावेळी आवर्जून करत कोलाड क्लबचे अभिनंदन केले .
यावेळी कोलाड लायन्स क्लबचे मार्गदर्शक पराग फुकणे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष नरेश बिरगावले यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लायन सदस्यांनी अथक परिश्रम घेतले
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली