RAYGAD
लोकसंदेश प्रतिनिधी शाम लोखंडे
रोहा तालुक्यात कोलाड आंबेवाडी येथे केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री. ना. प्रल्हाद सिंह पटेल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला व रेशन धान्य दुकानास सदिच्छा भेट ,
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय व जलशक्ती मंत्रालय भारत सरकार विकास राज्य मंत्री ना. प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कोलाड आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रतील आरोग्य योजनांचा व लसीकरण केंद्राला तसेच रेशन धान्य दुकानाला भेट देत घेतला आढावा.
रायगड लोकसभा प्रवास योजना या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्य मंत्री नामदार प्रल्हाद सिंह पटेल यांनी पंतप्रधान योजनेअंतर्गत आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान विमा योजना रेशन धान्य, पाणी योजना, इत्यादी अनेक योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बंधू भगिनी, व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी, काही तक्रार असल्यास त्याबद्दल काही शंका असल्यास त्याचे निवारण करण्यात आले.तसेच त्यांनी या योजना राबविण्यात काही त्रुटी असल्यास त्याबद्दल लाभार्थ्यांना विचारणा केली.
केंद्र सरकारच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत अथवा त्या लाभार्त्यापर्यंत पोहचवण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने योग्य पद्धतीने केले जात आहे की नाही अथवा त्या योजना राबविताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही ना याचा देखील आढावा या प्रसंगी प्रशासकीय व शासकीय अधिकारी समवेत लाभार्त्यांकडून घेतला.
केंद्र सरकारने जारी केलेल्या योजना तसेच '"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण मते शेवटच्या टोकाला आलेल्या नागरिकाला हा लाभ मिळाला पाहिजे.गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी लोककल्याकरी योजना भारत सरकारने सुरू केल्या असून या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून ग्रामीण गावातील काही प्रश्न समस्या असतील तर त्या अधिक जाणून घेऊन त्या योजनांचा अधिक लाभ त्या लाभार्त्यापर्यंत पोहचावा असा संवाद यावेळी संबधित व उपस्थित अधिकारी वर्ग व भाजप कार्यकर्त्यांशी साधला .
प्रसंगी लाभार्थ्यांना यावेळी विविध विमा योजना ,विभूक्त बी पी एल धारक यांना रेशन कार्ड व धान्य केंद्रीय मंत्री यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर,आमदार विनय नातू,सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य केंद्र अलिबाग,युवा नेते वैकुंठ शेठ पाटील,रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग,आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ विभागीय अध्यक्ष रविंद्र मामलूस्कर, डॉ अभय ससाणे आरोग्य केंद्र अधिकारी रोहा, विठ्ठल इनामदार प्रांत अधिकारी रोहा पेण,श्रीमती कविता जाधव तहसीलदार रोहा ,शुभदा पाटील गट विकास अधिकारी रोहा, डॉ महेश वाघ,व डॉ वैभव तीवडे,दर्शना वरूठे, वैद्यकीय अधिकारी कोलाड,रेशन धान्य दुकानदार ,सरपंच,तसेच ग्रामस्थ व आदी सर्व लाभार्थी व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली