महागाई पे चर्चा कार्यक्रमांतर्गत काँग्रेसने जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या भावना....
सर्वसामान्यांना न्याय देणारे, रोजगार देणारे, महागाई कमी करणारे सरकार पाहिजे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महागाई पे चर्चा हा कार्यक्रम राबविण्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण शहरातील बाझारपेठेत जाऊन सर्वसामान्य फळविक्रेते, व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या महागाई बाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. घरगुती स्वयंपाकाचा गॅसची वाढती किंमत, पेट्रोल, डिझेल, सी एन जी ची वाढती किंमत, त्यामुळे दळणवळण करताना होणारा आर्थिक ताण, दररोजच्या वापरातील वस्तूंच्या वाढत्या दरामुळे व भाजीपाला फळे यांची झालेली दरवाढ, औषधे व इतर अत्यावश्यक सेवेवर वाढत्या महागाईचा परिणाम झाल्याचे सांगत उरण येथील नागरिकांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला.
आम्हाला सर्वसामान्यांचे सरकार पाहिजे. आम्हाला रोजगार देणारे सरकार पाहिजे, आम्हाला महागाई कमी करणारे सरकार पाहिजे. गोरगरिबांना जगविणारे आम्हाला सरकार पाहिजे असे वेगवेगळे मत व्यावसायिक, व्यापारी, फळविक्रेते, भाजी विक्रेते, सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महागाई पे चर्चा या कार्यक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना, व्यापारी, व्यावसायिक भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारे, महागाई कमी करणारे सरकार पाहिजे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.
या महागाई पे चर्चा कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शाकीर शेख,तालुका सेवा दल अध्यक्ष कमलाकर घरत,
कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली