PUNE: शेखर सिंह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयांत दाखल. आपल्या पदाचा शेखर सिंह यांनी स्वीकारला पदभार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

PUNE: शेखर सिंह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयांत दाखल. आपल्या पदाचा शेखर सिंह यांनी स्वीकारला पदभार




PUNE
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी, पिंपरी

अखेर शेखर सिंह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयांत दाखल. आपल्या पदाचा शेखर सिंह यांनी स्वीकारला पदभार.




चिंचवड. महानगरपालिकेचे नव्या आयुक्त राजेश पाटील यांची दोन दिवसापूर्वी राज्य शासनांने बदली केली असून त्यांच्या जागी शेखर सिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी आयुक्त कार्यालयांत हजर होवुन आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या अनुपस्थिंतीत शेखर सिंह यांनी पदभार घेतला. शेखर सिंह यांनी पदभार घेताच पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराला दुसरे आयआयटी पदवीधर तथा (सॉफ्टवेअर) इंजिनिअर अधिकारी या पिंपरी चिंचवड शहरांला मिळाले असून या अगोदरही श्रावण हुर्डीकर हे सुद्धा आयटी इंजिनिअर आयुक्त होते. शेखर सिंह पुढे म्हणाले त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. मी दिल्लीकर असलो तरी माझी मराठी चांगली आहे. मला मराठी चांगले बोलता येते , मी मराठी चांगले शिकलो, माझे मराठी चांगले झाले आहे. तीन वर्ष मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी (सीईओ) म्हणून काम केल्यांचा फायदा मराठी चांगले होण्यांत झाला असे ते म्हणाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या पावणेतीन वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तो कधी नियमित होणार या प्रश्नांवर फीडबँक घेऊन सांगतो असेही सावध उत्तर नव्या आयुक्तांनी दिले. सातारच्या बदलीनंतर मी गावी गेल्यांने इकडे येण्यांस उशीर झाला परिणामी पदभार घेण्यांसही उशीर लागला असे यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले पालिका आयुक्त म्हणून माझी पहिलीच पोस्टिंग आहे.


त्यातही पिंपरी चिंचवड  सारख्या  वेगाने विकासित  होत  असलेल्या  शहरांत  माझी  नियुक्ती  झाल्यांने  आनंद  असून  त्याचबरोबर  त्यांतून जबाबदारीची  ही  जाणीव आहे  असे  शेखर  सिंह  म्हणाले. सुरू असलेली कामे व मूलभूत सोयी सुविधांना आणखीन वेग देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती करून शहरात च्या नावलौकिकांत  वाढ करण्यासांठी  मी नक्कीच  भर  देणार असल्यांची  ठाम  ग्वाही  पिंपरी  चिंचवडचे  नूतन आयुक्त  शेखर  सिंह यांनी यावेळी  पत्रकारांशी  संवाद  साधताना  दिली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली