PUNE
संभाजी गोसावी प्रतिनिधी पुणे
राज्यांतील सत्ता बदल होताच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त प्रशासक राजेश पाटील यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यांत आली. तर त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यांत आली. महापालिका प्रशासनांस शिस्त लावणारे चुकीच्या कामांना ब्रेक लावण्यांचे काम त्यांनी सव्वा वर्षात केले आहे. ओडिशा केडरचे २००५ मधील आयएएस अधिकारी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राजेश पाटील यांची प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख होती. आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पिंपरी चिंचवड शहरांत पाटील यांची नियुक्ती झाली होती. तर आता त्यांच्या जागेवर सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यांत आली. शेखर सिंह हे २०१६ मधील आयएएस अधिकारी असून त्यांनी देशपातळीवर ३०६ वा क्रमांक पटकावला होता. त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा अशा विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई