NANDED
लोकसंदेश प्रतिनिधी नांदेड
फिट अँड फाइन सायकल प्रेमी अधिकारी नांदेडकर यांच्या कायम आठवणीत राहणार. . नांदेड जिल्ह्यांचे कर्तव्य आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांची शुक्रवारी रात्री उशिरा नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यांत आली. नांदेड जिल्ह्यांमध्ये त्यांनी लोकप्रिय आणि उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून नावलौकिक करुन आपल्या नावाची कारकीर्द त्यांनी चांगलीच गाजवली होती. विपिन इटनकर यांनी स्वतांच्या पत्नीची प्रसूती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयांत केली होती. हा त्यांचा साधेपणा चांगलाच नांदेड जिल्ह्यांमध्ये चर्चेत रंगला गेला. फिटनेसच्या बाबतीत डॉ. विपिन इटणकर कायम कर्तव्यदक्ष होते. स्वता जिल्हाधिकारी असूनही रात्री नांदेडच्या नागरिकांना ते सायकलवरुन रात्रीबेरात्री भेटत असत असे जिल्हाधिकारी प्रथम नांदेडकरांना मिळाले होते.
कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी
विपिन इटनकर हे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू होतात. कोरोनांची लाट आली मात्र या लाटेत स्वता डॉक्टर असलेल्या विपिन इटनकर यांनी प्रभावीपणे जिल्हा प्रशासनांला हाताशी घेवुन काम केले.कोरोना काळात मृत्युदर रोखण्यांत ते सर्वांच्या मदतीने यशस्वी झाले होते. त्यासोबतच कोरोनांच्या प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयांतच उपचार मिळावेत यासाठी त्यांचे कायमच प्रयत्न राहिले. करुणाच्या कालावधीतील लोकप्रिय झाले अहोरात्र जागून त्यांनी नांदेड जिल्ह्यांत उत्कृंष्ट पारदर्शक आपली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला. जिल्हाधिकारी असूनही अनेकदा ते नांदेडच्या नागरिकांना सायकलवरुन कधी पण भेटत होते.
नागपूर मिळाल्यांने आश्चर्य.
जिल्हाधिकारी म्हणून विपिन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यांत प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यांच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात जिल्हाधिकारी या पदावरुन त्यांना पदभार घेण्याचा आदेश देण्यांत आला होता. यावेळी डॉ. विपिन इटनकर यांनी नांदेडचा जिल्हाधिकारी अतिरिक्त कारभार खुशालसिंग परदेशी यांच्याकडे सोपवून नागपूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यासाठी ते रवाना झाले त्यांनी नागपूर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्हाधिकारी श्रीमती. आर विमला यांच्याकडूंन शनिवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली