'शेखर बापू रणखांबे'
हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होतंच परंतु; शेखर बापू रणखांबे' हे फक्त नाव नाही... तो आता प्रचंड कार्यमग्न असलेला वास्तव जगातील धगधगत्या विचारांचा अंगार बनतो आहे.
सांस्कृतिक क्षेत्र केवळ मनोरंजन, प्रबोधन करण्यासाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनाच सशक्त माध्यम असतं. दबलेल्या-पिचलेल्या उपेक्षितांच अंतरंग असतं. ज्यांनी माणुसकीच्या विजयासाठी सर्व कला शस्त्रं म्हणून उभी केली, अशा शब्द'उद्धारक, माणुसकीचा मूर्तीमंत साक्षात्कार असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर; 'तू गुलाम नाहीस, वास्तव जगाचा निर्माता आहेस ।' हे जगण्याचा- मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेखर बापू रणखांबे एक तरुण लेखक दिग्दर्शक करतो आहे.
आतापर्यंत शेखरने 'हाऱ्या - नाऱ्या' इरसाल इनोदी वेबसेरीज, काळजाच्या गाभाऱ्यात अलगद उतरणारी 'कबुतर'सारखी हळवी, गुलाबी प्रेमकथेची वेबसेरीज तर मूक, चिमणराव, धोंडा, गोष्ट, पंजाबी ड्रेस, रेन वॉटर, लेट कमर,पॅम्प्लेट अशा नावाजलेल्या गाजलेल्या शॉर्टफिल्म्स (लघुपट) बनविल्या आहेत. मानसिक गुलामगिरीवर भाष्य करणारी अतिशय गहन आणि संवेदनशील लघुपट 'पॅम्प्लेट'
'इफ्फी' सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आला. अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय ठिकाणी पारितोषिकानी सन्मान करण्यात आला.
......आणि शेखरयुगास प्रारंभ झाला; नुकत्याच झालेल्या "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत
सांस्कृतीक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने ‘स्वराज्य महोत्सव’ या *राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘रेखा’ या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापु रणखांबे दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट स्री कलाकार ( माया पवार हिचा पहिलाच चित्रपट ) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले.
यामध्ये प्रामुख्याने निर्माते रविंद्र हरिश्चंद्र जाधव,मेघना रविंद्र जाधव, कॅमेरा प्रताप जोशी,संकलन वैभव जाधव,ध्वनी संयोजन मंदार कमलापुरकर, सचिदानंद टिकम यांच्यासह
कलाकार - माया पवार, वैशालि केंदळे, अनुराधा साळुंखे, तमिना पवार, सत्याप्पा मोरे, विशाल शिरतोडे, जानवी बसूगडे, शर्वरी माळी, जानवी कांबळे, पवन सुर्यवंशी; प्रोडक्शन मैनेजर - सचिन ठाणेकर, सहाय्यक दिग्दर्शक - लखन जोतिराम चौधरी, किसन चव्हाण, मुकेश कांबळे, सुचेता इंगळे, विक्रम शिरतोडे, मेकअप - मंगेश गायकवाड़ यांचं योगदान आहेच. त्याचबरोबर, ह्या लघुपटासाठी राबलेल्या प्रत्येक हाताचे आणि गुंतलेल्या प्रत्येक हृदयाचे मनापासून अभिनंदन...!!
येणाऱ्या काळात ‘रेखा’ हा लघुपट देश आणि परदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात आपल्या लहान शहरातील तसेच गावखेड्यातील स्त्रियांचा अत्यंत महत्वाचा परंतु सर्व स्तरावर दुर्लक्षित असलेला प्रश्न जगाच्या रंगमंचावर आपला आक्रोश नोंदवेल. स्वतःचा हक्क सांगेल,हे निश्चित.
---- लोकशाहीर दादा कोंडके यांच्या कलाकृतीतील अस्सल मिश्किली, निखळ रांगडेपणा आणि 'स्वप्न वास्तवात विकणारा'... निसर्गासारखा अथांग दूरदृष्टीचा चित्रकर्मी दिग्दर्शक राज कपूर यांचा प्रभाव असणारा 21 व्या शतकातील शेखर बापू रणखांबे हा चैतन्याने भारलेला तरुण आकाशाला गवसणी घालेलंच, असा दृढविश्वास आहेच. फक्त गरज आहे ती नेहमीसारखे जमिनीवर चालण्याची.
शेखर सर Sss.…
मनापासून अभिनंदन ।।🌱🌹💚🌹🌱
💝!..लेखणीपुत्र💝
ता.क. - 'रेखा' मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून कुलदीप देवकुळे यांनी जबाबदारी सांभाळणे म्हणजे काय ...? चेष्टा हाय वि…हं Sss 💘
लोकसंदेश मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली