MUMBAI : सांगली विधानसभा विकास कामासाठी निधी मिळणेबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे मागणी.. आमदार सुधीरदादा गाडगीळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : सांगली विधानसभा विकास कामासाठी निधी मिळणेबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे मागणी.. आमदार सुधीरदादा गाडगीळ



MUMBAI
लोकसंदेश प्रतिनिधी

सांगली विधानसभा विकास कामासाठी निधी मिळणेबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे मागणी.. आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली गुरुवार ११ ऑगस्ट २२ :- मुंबई विधानभवन येथे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांची आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेऊन सांगली विधानसभा क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्राच्या विकासच्या दृष्टीने अनेक कामांचे प्रस्ताव दिले. व सांगलीतील विकासकामे वेगाने होण्यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी विनंती केली. यावेळी सांगली विधानसभा क्षेत्रातील महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते विकासकामासाठी नगरविकास मधून १०० कोटींची मागणी केली.



तसेच तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा समावेश एथलेटीक्स स्पोर्ट्स सेंटर मध्ये करण्यासाठी मागणी केली, (strom water management) साठी निधी उपलब्ध करणे बाबत, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विकसित करण्यासाठी, जुन्या व जीर्ण झालेल्या पाईप लाईन बदलण्यासाठी अमृत २.० योजने तून निधी मिळणे बाबत, मनपा मुख्यालय इमारत बांधकामास निधी मिळणे, कुपवाड शहर भुयारी गटर योजनेच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत, विस्तारित भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणेबाबत, मनपा मुख्यालयाच्या जागा बदल्याच्या प्रस्तावाबाबत, सांगली मिरज रस्ताचे रुंदीकरण व विकसना बाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत, फिश मार्केट बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी देणेबाबत, प्रादेशिक आपत्ती व्यस्थापन केंद्र सक्षमीकरण प्रस्तावाबाबत, व सागंली येथील काळीखण तलाव पुनरुज्जीवन व सुशोभिकरणाच्या प्रस्तावास मान्यता मिळणे, ग्रामीण भागास २५-१५ योजनेंतर्गत निधी मिळणेबाबत तसेच सांगली जिल्ह्यासाठी सांगली येथे स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळास मंजुरी मिळण्याबाबत तसेच नाबार्ड -२८ योजने अंतर्गत कर्नाळ रोड व हरिपूर रोड वरील २ लहान पुलांची मागणी केली, तसेच पुरवणी बजेट मधुन सांगली विधानसभा क्षेत्रासाठी प्रमुख जिल्हामार्ग व राज्य मार्ग यासाठी निधींची मागणी केली, अशा विविध विकासकामाबाबत चर्चा करून निधी मिळण्याची विनंती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली व यासर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले. यावेळी प्रदेश सदस्य शेखर इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी व किरण भोसले उपस्थित होते..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली