कुरुंदवाड: मोहरम सणा निमित्त महाप्रसाद वाटपाची दयावान तालमीची एक दशकाची परंपरा कायम.।!!
ऐतिहासिक नगरी कुरुंदवाड मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जाते या अनुषंगाने मोहरम सणा निमित्त येथील दयावान तालमीच्या वतीने गेल्या १० वर्षापासून महाप्रसाद वाटपाची परंपरा कायम राखली आहे...
दयावान तालमी मार्फत गेल्या १० वर्षापासून मोहरम पीर पंजा प्रतिष्ठापण नंतर सातव्या आठव्या नवव्या भेटीच्या दरम्यान सहभागी शेकडो भाविकांना दररोज सायंकाळी नगरपालिका चौक येथे महाप्रसाद वाटप करण्यात येतो तसेच मोहरमच्या दहाव्या दिवशी सर्व भक्तांना अल्पोपहार आणि महाप्रसाद देण्यात येतो
कुरुंदवाड शहराला हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे येथे अनेक मंदिरामध्ये पिराची प्रतिष्ठापना केली जाते तर बहुसंख्य मशिदीमध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो यापूर्वी राज्यात अनेक जातीय दंगली झाल्या मात्र येथील हिंदू मुस्लिम सलोखा त्या काळातही टिकून राहिला आहे
या परंपरेला साजेस काम येथील दयावान तालमीचे प्रमुख नगरसेवक अनुप मधाळे यांनी आपले वडील ज्येष्ठ नेते रामदास मधाळे यांनी सुरू केलेली परंपरा आजही अबाधित ठेवली आहे
सामाजिक कार्य करण्यात मधाळे कुटुंबीय सातत्याने आघाडीवर असते या अनुषंगाने दोन वर्षे आलेले कोरोनाचे संकट व लॉकडाऊन मध्ये या काळातही नाममात्र शुल्क आकारून गरजू लोकांना दयावान भोजन थाळी घरपोच केली होती तर ज्येष्ठ नेते रामदास मधाळे हे गेल्या अनेक वर्षापासून निराधार व्यक्ती, भिकारी यांना पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने दररोज सकाळी आपल्या व्हॅन गाडीमध्ये अन्नपदार्थ भरून ते कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर येथील बस स्थानक परिसर तसेच अन्य ठिकाणी पोटभर जेवण त्या निराधार व्यक्तींना पोहोच करतात हा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे
सन 2019 व 21 साली कुरुंदवाड शहराला महापुराने चांगलेच वेढले होते या परिस्थितीमध्ये दयावान तालमीच्या वतीने अनुप मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या शेकडो पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवले त्याचबरोबर त्यांना जेवण देण्याची व्यवस्था ही केली तसेच त्यांना दोन वेळचे दूध पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि त्या पूरग्रस्तांना आधारही दिला या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दयावान तालमीचे कुरुंदवाड शहर परिसरातून विशेष कौतुक होत आहे
दयावान तालमीच्या वतीने मोहरम निमित्त महाप्रसादाचे केलेले वाटप हा एक सामाजिक सलोखा राखण्याचा उद्देश असून सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारा आहे पंजा भेटीचा कार्यक्रम रात्री उशिरा असतो यामुळे आबाल वृद्ध महिला यांना हा सोहळा पाहण्याच्या निमित्ताने त्यांना आपल्या या सोहळ्याचा आनंद लुटता यावा या उद्देशाने महाप्रसाद वाटप केला जातो जेणेकरून या सोहळ्याचा आनंद सर्वांना घेता यावा हाच मुख्य उद्देश आहे
"या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे या वेळी बोलताना बालाजी भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली