KOLHAPUR :हातकणंगले तालुका विभाजन विरोधी कृती समितीमार्फत आज हातकणंगले बाजारपेठ येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR :हातकणंगले तालुका विभाजन विरोधी कृती समितीमार्फत आज हातकणंगले बाजारपेठ येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा...



KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

हातकणंगले तालुका विभाजन विरोधी कृती समितीमार्फत आज हातकणंगले बाजारपेठ येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून या तालुका विभाजनाचा निषेध व्यक्त करण्यात आला

काही दिवसांपासून हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी येथे तालुका नेण्याचा प्रयत्न काही इचरकंजीचे लोकप्रतिनिधी करत असल्याने आज हातकणंगले व हातकणंगले परिसरातील नागरिकांनी या निर्णयाच्या विरुद्ध गाव बंद ठेवून मोर्चा काढून काही काळ कोल्हापूर सांगली महामार्ग वरती रस्ता रोको केला व आपली मनोगते व्यक्त केली व हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन दिले



 यावेळी निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला की, हातकणंगले हे गाव दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मध्यवरती आहे,  तालुक्याच्या चोहुबाजूनी या हातकणंगले गावामध्ये येण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत या गावात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा धोका उद्भवत नाही तसेच या तालुक्याची स्थापना 1885 साली  झाली असून शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये  या ठिकाणी रेल्वे स्टेशन शासकीय कार्यालयाच्या इमारती बांधण्यात आल्या तर इचलकरंजीचे त्याकाळचे जहागीरदार ना .बा घोरपडे यांच्या सहमतीने हे ठिकाण निवडण्यात आले होते या तालुक्यात एकूण 62 गावांचा समावेश असून या गावापासून हातकणंगलेला  जोडणारे मार्ग आहेत.



           कोणत्याही परिस्थितीमध्ये हातकणंगल्यास येण्यास कोणताही अडचण नसून सर्व बाजूंनी अंतरही जेमतेमच आहे तर या उलट पक्षी इचलकरंजी मध्ये तालुका हलवला तर इचलकरंजीला नेहमीच महापुराचा फटका बसतो व  इचलकरंजी गाव हे तालुक्याचे शेवटचे गाव असून या इचरकंजीलगत कर्नाटक हद्द लागते  तसेच या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण केले तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गावांना याचा फायदा होईल मात्र इतर गावांना या ठिकाणी येणे सोयीस्कर नाही





 तसेच हातकणंगले गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला असून या तालुक्यातील सर्व इमारती या शासकीय जागेतच आहेत तसेच शासन निर्णयानुसार नगरपंचायत आहे त्याच ठिकाणी न्यायालय , प्रांत कार्यालय स्थापन करण्यात यावे या दृष्टीने हातकणंगले नगरपंचायत न्यायालय प्रांत कार्यालयाची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता व काही काळ कोल्हापूर सांगली महामार्ग रुखून धरला यावेळी तालुक्यातून आलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्वपक्षीय नेते मंडळींनी  या विभाजनाच्या निर्णयाला ठाम विरोध केला तसेच प्रकाश आवाडे यांचा तीव्र शब्दात निषेध ही यावेळी करण्यात आला व जर का शासनाने हा निर्णय थांबवला नाही तर उग्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे

 हातकणंगले तालुक्याचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू तसेच विधानसभेतील हा प्रश्न उपस्थित करू तसेच हातकणंगले विभाजन विरोधी कृती समितीच्या सदैव पाठीशी राहू व शक्य तितकी मदत करू:आमदार राजू बाबा आवळे

         ....हातकणंगले तालुक्याची निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी केली असून 2022 हे आपण त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहे मात्र या तालुक्याचे विभाजन म्हणजे त्यांच्या विचारांचाअवमान  आहे त्यामुळे जर का कोणी असे करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ .संदीप कारंडे माजी सरपंच हातकणंगले
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली