KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबलीच्या एम जी शहा विद्यामंदिर व ज्यु कॉलेज मधील शिक्षकाकडून खराडे कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्याची मदत
मनोहर बाळासो खराडे यांचे घर पावसामुळे घर पडलेले होते. अशावेळी या कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशाने एम जी शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज बाहुबली मधील इयत्ता पाचवी अध्यापन करणारे शिक्षक यांच्याकडून या कुटुंबाला हातभार लावण्याचे कार्य केले गेले. घराच्या पडझडीमुळे घरातील वस्तू पूर्णतः खराब झालेल्या होत्या अशा संसार उपयोगी साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले. सौ शीलप्रभा कोले, श्री श्रीमंधर वांजुळे, श्री विनोद मगदूम श्री भैरू बागडी सौ अश्विनी पाटील श्री श्रीपाल तामगावे यांनी सदरचे साहित्य पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मयुरेश खराडे या मुलाच्या पालकाकडे सुपूर्द केले. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोमटेश बेडगे यांची प्रेरणा लाभली तर उपमुख्याध्यापक श्री अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक श्री नेमिनाथ बाळीकाई यांच्यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले याकामी कुंभोज पत्रकार संघाने पुढाकार घेतला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली