KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
कुंभोज येथे गुणवंत विद्यार्थी,सफाई कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण संपन्न
मेरी जान तिरंगा है मेरी शान तिरंगा है या गीताच्या बोला नंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कुंभोज तालुका हातकणंगले येथे सकाळी सात वाजल्यापासून शासकीय कार्यालय, दीपक चौक,आंबेडकर चौक,आरोग्य पथक सर्व शाळा येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाची लगबग सुरू झाली.
कुंभोज येथे आज सकाळी ग्रामपंचायत कुंभोज येथील ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थिनी मायाश्वरि जमणे व दीपक चौकीतील ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थी स्वागत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीर पुतळा परिसरातील ध्वजारोहण ग्रामपंचायत सपाजी कर्मचारी संगीता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर आरोग्य पथक कुंभोज येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य अम अमरजीत बंडगर. विशाखा माळी भारती पोतदार स्मिता चौगुले अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणचे ध्वजारोहण करण्यात आले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त गोपाळ काला अभियानांतर्गत लहान मुलांना भोजनाच्या व्यवस्था शालेय च्या वतीने करण्यात आली. तर आरोग्य पथक कुंभोज यांच्या वतीने गर्ल हायस्कूल कुंभोज व कन्या शाळा कुंभोज येथे मुलींना महिला व त्यांच्या समस्या, वाढते वय व होणारे बदल यावरती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कुंभचा आरोग्य पथकाचे डॉक्टर श्रेयस चौगुले व डॉक्टर येणार सुळे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. सकाळी नऊ वाजता हातकण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार राजू बाबा यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅलीचे आगमन कुंभोज येथे झाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली