KOLHAPUR: कुंभोज ग्रामपंचायत वतीने विकासकामासाठी आ.प्रकाश आवाडे यांना निवेदन....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: कुंभोज ग्रामपंचायत वतीने विकासकामासाठी आ.प्रकाश आवाडे यांना निवेदन....



KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

कुंभोज ग्रामपंचायत वतीने विकासकामासाठी आ.प्रकाश आवाडे यांना निवेदन....

कुंभोज ता.हातकणंगले ग्रामपंचायत यांच्यावतीने आमदार प्रकाश आवडे यांना कुंभोज येथील भेट घेऊन गावातील विकास कामांची निवेदन ग्रामपंचायत यांच्या वतीने देण्यात आले मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ता योजनेअंतर्गत निधी मंजूर होणे बाबत, कुंभोज ग्रामपंचायत कार्यालय वाढीव इमारत बांधकाम निधी मिळणे बाबत, आरोग्य केंद्रास पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे बाबत, चौगुलेवाडी, शिवाजीनगर, शाहूनगर,विकास कामासाठी निधी मिळणे बाबत, ग्रामीण मार्ग 251 बाह्य रस्ता डांबरीकरण करण्यासाठी निधी मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार प्रकाश आवडे यांनी वेगवेगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कुंभोज ग्रामपंचायत तिने मागितलेल्या सर्व विकास कामासाठी निधी लावण्यात येईल त्याच पद्धतीने अपुरे असणाऱ्या ग्रामसचिवालयासाठी ग्रामविकास खात्याकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील सदर अधिवेशनानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना भेटून स्वतः निधी उपलब्ध करून देऊ असा आश्वासनही त्यांनी दिले


यावेळी कुंभोज ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिकेत चौगुले, जवाहर सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील किरण माळी, ग्रामपंचायत सदस्य दावीत घाटगे आप्पासाहेब पाटील, किरण नामे ,लखन भोसले, सुदर्शन चौगुले, अभिनंदन चौगुले, सदाशिव महापूरे, अशोक आरगे उपस्थित होते. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली