KOLHAPUR:
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
साजणी येथील वर्षा कांबळे हिची आत्महत्या नसून घातपात, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा बहुजन वंचित आघाडीचे पोलिसांना निवेदन
साजणी ता हातकलंगले येथील वर्षा कांबळे या मुलीच्या हत्ते प्रकरणी बहुजन वंचित आघाडी कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने डॉ शरद पाटील, व डॉ मेनिका पाटील यांच्यावर कलम 302 व ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करणे बाबत बहुजन वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास कांबळे, राज्य संघटक डॉक्टर क्रांती सावंत यांच्या वतीने आज हातकणगले पोलीस स्टेशन येथे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वंजने व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
सदर मुलीला डॉक्टर परिवाराच्या कडून शारीरिक व मानसिक त्रास होत होता, परिणामी मुलीच्या मृत्यू प्रसंगी त्यांच्या घरच्या लोकांना कोणतीही माहिती न देता हातकणगले पोलीस स्टेशनला नेऊन मुलीचा मृत्यू झाला अशी खोटी वर्दी देण्यास भाग पाडले सदर घटनेची माहिती कोणत्याही जवळच्या नातेवाईकास न देता डॉक्टर शरद पाटील व गावचे पोलीस पाटील यांचे पती यांनी पूरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणांमध्ये पोलिसांनी योग्य कलम लावणे गरजेचे होते.पण पोलिसांनी फक्त कलम 306 लावले आहेत त्याच बरोबर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कलम 302 लावून डॉक्टर शरद पाटील यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते. शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करताना दिरंगाई केली असून आरोपीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे.
घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज आरोपी डॉ शरद पाटील व त्यांचे नातेवाईक हे पुरावे नष्ट करतील अशी भीती असून ते सीसीटीव्ही फुटेज व त्या संपूर्ण दिवसभराची फुटेज मिळावेत तसेच गुन्हा नोंद करावा, जिल्हा आरोग्य विभाग मार्फत साई हॉस्पिटल डॉ. शरद पाटील यांची पत्नी डॉक्टर मोनका पाटील यांच्या दवाखाना परवानेची तपासणी करावी
तरी सर्व घटना पाहता मुलीने दोन दिवस कामाला न जाणे डॉक्टरांनी फोन करून दुसऱ्या दिवशी अवेळी बोलवणे, आई सोबत असताना आईला घरी पाठवणे या सर्व घटना संशयास्पद वाटत असून मुलीने आत्महत्या केल्याचा खोटा बनवा असून ही हत्या असावी असा संशय आहे. तरी तिच्या दवाखान्यात झालेला मृत्यू हा घातपात आहे तरी त्याची चौकशी होऊन मुलीला न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन आज बहुजन वंचित आघाडी यांच्यावतीने जयसिंगपूर पोलीस उपविभागीय पोलीस आधिकारी रामेश्वर वंजणे यांना देण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली