KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवाना घरपट्टी देयकामध्ये ५०% सवलत मिळणेबाबत. गट विकास अधिकारी यांना निवेदन
हातकणंगले तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना ५०% घरफाळा मध्ये काही ग्रामपंचायत सवलत देतात परंतु बऱ्याच ग्रामपंचायती सवलत देणेस टाळाटाळ करत आहेत. 10/12/2020 ला शासन निर्णय झाला आहे. कृ. कार्या. 12.2 सर्किर्ण आर आर 1029/2020 झाला असुन सदर तारखेपासून दिव्यांगाना घरफाळा व पाणीपट्टी मध्ये ५० % सवलत मिळावी ,अन्यता आदोलन करण्यात येईल. हातकलंगले तालुक्यातील मजले लाटवडे हेल ग्रामपंचायतीने सदर आदेशाची अंमलबजावणी केली असून शासनाचा आदेश असतानाही ग्रामपंचायत मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळ्या तयार करत आहेत सदर आदेशाचे अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल परिणामी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आव्हान माझी पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी निवेदनाद्वारे हातकणंगले पंचायत समिती सहाय्यक गटविकास आधिकारी सतीश देशमुख यांना देण्यात आले.
अशोक बाजीराव पाटील अध्यक्ष नृसिंह दिव्यांग सेवा लाटवडे, अविनाश चव्हाण, शक्ती घोदे, शिवाजी घोदे, राजेंद्र सपकाळ ,सुनील मांढरे ,कुमार भोसले, दादा एगारे आदि अपंग ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली