KOLHAPUR: संजय घोडावत यांनी शून्यातून विश्व निर्माण केले : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: संजय घोडावत यांनी शून्यातून विश्व निर्माण केले : जिल्हाधिकारी राहुल रेखावार




KOLHAPUR:
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

संजय घोडावत यांनी शून्यातून विश्व निर्माण केले : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
घोडावत पॉलीटेक्निकचा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

उद्योगपती संजयजी घोडावत यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याच शिक्षण संकुलात संजयजी यांचा सहवास मिळतोय त्यामुळे येथील विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. शिक्षण हे नेहमी लढाईची प्रेरणा देते. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणच हा एकमेव पर्याय आहे. शिक्षणाचा पाया जेवढा मजबूत तेवढीच आयुष्याची इमारत भक्कम होते. विद्यार्थी दशेत असतानाच विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या क्षमतांची जाणीव करून घेणे गरजेचे आहे. शैक्षणिक दिवस परत कधीही येणार नाहीत त्यामुळे येथे मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या, अभ्यासाबरोबरच सर्वच क्षेत्रात सहभागी व्हा. आरोग्याची काळजी घ्या. असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.राहुलजी रेखावार यांनी केले. संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या १० व्या वर्धापनदिनी ते बोलत होते.



संजय घोडावत पॉलीटेक्निकचा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगपती संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, प्राचार्य श्री.विराट गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्री संजयजी घोडावत हे होते.


अध्यक्षीय भाषणात बोलताना संजय घोडावत म्हणाले '' विद्यार्थ्यांनी नेहमी चांगली संगत ठेवावी, सकारात्मक लोकांच्यामध्ये राहायला हवे. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांच्या सारख्या व्यक्तींचा आदर्श ठेवायला पाहिजे. आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तर डगमगून न जाता त्यावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. चुकीच्या व्यक्तिपूढे अजिबात झुकू नका पण थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला नम्र व्हायला हवे. आई वडील हे आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू आहेत त्यांना कधीही विसरू नका. माझ्या अडचणीच्या काळात माझ्या पत्नीने खंबीर साथ दिली आहे. माझ्या प्रत्येक निर्णयातून माझे कुटुंबीय भक्कम उभे राहिले आहेत. कोणताही व्यवसाय सुरू केला की पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही त्यामुळे जिद्द न हारता आपल्या ध्येयाकडे प्रामाणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. सर्वानी आपल्या कामासोबत आरोग्यही जपायला हवे. ग्रुप च्या माध्यमातून आज जवळपास १० हजाराहून जास्त लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला व १६ हजाराहून जास्त विद्यार्थ्यांना आज शिक्षण देण्याचे काम संजय घोडावत विद्यापीठ करीत आहे खरंच आज या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही जो विश्वस्त विनायक भोसले , प्राचार्य विराट गिरी यांच्यावर विश्वास दाखविला त्यांनी तो सार्थ करून दाखविला आहे. नवे राष्ट्रीय धोरण चा विचार करून पुढील वर्षी या डिप्लोमा इन्स्टिटयूट चे डिग्री इन्स्टिटयूट करण्याचा आमचा मानस आहे''
पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री विराट गिरी प्रास्ताविकात म्हणाले '' पॉलीटेक्निकने लागोपाठ तीन वेळा एनबीए मानांकन मिळविले आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे .या यशामध्ये चेअरमन ,विश्वस्त, स्टाफ, विद्यार्थी व पालक यांचा महत्वाचा वाटा आहे. ''


विश्वस्त श्री. विनायक भोसले म्हणाले '' विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करायला पाहिजे, आई वडिलांचा आदर करायला हवा तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत. यापुढील आयुष्यात ध्येय निश्चिती करून ती पूर्ण होण्याचे दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करावेत. प्रत्येक बाबतीत आपला विचार इतरांपेक्षा कसा वेगळा असेल व त्या विचाराला आपण कसे यशस्वी करू शकतो हाच प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे''.
या कार्यक्रमात संस्थेला सलग तिसऱ्यांदा एनबीए मानांकन मिळाल्यामुळे सर्व विभागप्रमुख व एनबीए समन्वयक यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर पी.एचडी पदवी संपादन केल्याबद्दल डॉ.संदीप वाटेगावकर यांचा देखील सत्कार अध्यक्ष संजयजी घोडावत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये केदार दिंडे याने तृतीय वर्षात सिव्हिल इंजिनीरिंग मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी, व सर्व स्टाफ उपस्थित होते.


हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.मयुरेश पाटील व टीम ने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीपा दिवटे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मयुरेश पाटील यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,

सांगली