HATKANAGLE
लोकसंदेश हातकणंगले प्रतिनिधि
साजणी येथील आरोपी डॉक्टर कुटुंबावर मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करावा साजणी बौद्ध समाजाची मागणी
जिल्हा:कोल्हापूर ता.हातकणगले साजणी येथील वर्षा कांबळे साजणी दवाखान्यामध्ये संशयास्पद मृत्यदेह आढळुन आला, सदर आत्महत्या नसून घातपात असावा, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. सदर मुलीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समस्त बौद्ध समाज साजणी, ऑल इंडिया पॅथरसेना तथाकथ ग्रुप महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांना निवेदनाद्वारे हातकणगले पोलीस स्टेशन येथे देण्यात आला.
तसेच मुलगीच्या आई-वडीलांच्या तक्रार नुसार गेली 2-3 दिवस मुलगीला डॉक्टरांच्या कुटुंबापासून मानसिक व शारिरिक त्रास होता . डॉ. शरद पाटील ब गावचे पोलिस पाटील यांचे पती यांनी मुलगीच्या वडीलांना यासंबधी पुर्व माहिती न देता हातकणंगले पोलिस स्टेशनला घेवुन जावुन वर्दी देण्यास भाग पाडले व तुमची मुलगी मृत असल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेची कोणतेही मुलगीचे नातेवाईकास कल्पना न देता डॉ.शरद पाटील व गावचे पोलिस पाटील पती यांनी पुरवे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकरणामध्ये भा. द. स. कलम 302 व 306 लावणे गरजेचे होते पण हातकणंगले पोलिस स्टेशन मधील पोलिसानी फक्त (FIR No 0294) कलम 306 लावले आहे त्याचबरोबर अँट्रोसिटी नुसार अँक्ट डॉ. शरद पाटील यांच्यावर अँट्रोसिटि लावने गरजेचे होते पण पोलिसानी फक्त भा. द. स. कलम 306 लावले आहे.सदर प्रकरणामध्ये भा. द. स. कलम 302, 306 व अॅट्रोसिटी या कलमांचा समावेश करण्यात यावा व तसेच भा. द. स. कलम 302, 306 व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेली प्रत मिळवी, त्याच बरोबर जिल्हाआरोग्य विभाग जि. कोल्हापुर. यांच्या मार्फत साई होस्पिटल साजणी डॉ. शरद पाटील व त्यांची पत्नी डॉ. सौ. मोनिका पाटिल या दोघांचेही डॉक्टरकी प्रॅक्टिस परवाना ताबडतोब रद्द करावा.
तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपातिपणा आढ्ळल्यास समस्त बौद्ध समाज साजणी याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे हातकलंगले पोलीसांना देण्यात आला. यावेळी ऑल इंडिया प्राथर सेनेचे जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, निखिल कुरणे, ऑल इंडिया पेटर्शनेचे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, तसेच बौद्ध समाज साजणीचे पदाधिकारी, प्रदीप कुरणे बीसीपी महासचिव, रमेश कांबळे माझी तंटामुक्त अध्यक्ष, कृष्णात कांबळे शाखाध्यक्ष साजणी, रोहित कुरणे, मनोज कांबळे,सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली