DELHI : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानी; ही कामगिरी करणारे आशियातील पहिले व्यक्ती ठरले...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

DELHI : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानी; ही कामगिरी करणारे आशियातील पहिले व्यक्ती ठरले...



DELHI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानी; ही कामगिरी करणारे आशियातील भारतीय पहिले व्यक्ती ठरले

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावे आता एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. ही बाब अर्थविश्वाशी निगडित आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांकानुसार भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ही कामगिरी करणारे ते आशियातील पहिले व्यक्ती ठरले असून, यापूर्वी कुठल्याही आशियाई व्यक्तीला या यादीत हे स्थान गाठण्यास यश प्राप्त झाले नव्हते.




गौतम अदानी यांनी यादीत तिसरे स्थान मिळवत फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नोल्ट व मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. सध्या अदानी यांची एकूण संपत्ती १३७ बिलियन डॉलरच्या वर पोहचली आहे. सध्या जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांच्या वर अमेझॉनचे जेफ बेझोस हे असून एलॉन मस्कने अद्याप जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अव्वल स्थान कायम राखले आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.