BULDHANA : महाराष्ट्रातील या प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

BULDHANA : महाराष्ट्रातील या प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ



BULDHANA
लोकसंदेश न्यूज बुलढाणा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील या प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ

बुलढाणा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केल्यास शिंदे सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील,


 असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीका केली.

शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. “भारतात लोकशाही टिकवण्यासाठी पंक्षांतर बंदीचा कायदा आहे, त्याची योग्य अंमलबजावणी झाली, तर कोणी कुठून ही निवडून या. आम्ही त्यांना गोळा करू म्हणणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला पाहिजे.” अशी अपेक्षाही जयंत पाटल यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली