सांगली महापालिकेचा गोंधळ कारभार..... नव्या आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली महापालिकेचा गोंधळ कारभार..... नव्या आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज



SANGLI
लोकसंदेश संपादक,

सांगली महापालिकेचा गोंधळ कारभार..
नव्या आयुक्तानी लक्ष देण्याची गरज....

सांगली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षानंतर कोविडचे सावट संपल्यानंतर गणेशोत्सव मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे सांगलीकरांनी ठरवले आहे...


 ....त्याच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या व अर्जासाठी सांगली महापालिकेच्या कार्यरत व सक्षम अधिकाऱ्यांनी एक वेबसाईट सांगलीकरांना ऑनलाईन भरण्यासाठी दिली आहे...


 परंतु ही वेबसाईट ओपनच होत नसल्यामुळे या गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केलेली आहे... सांगली महापालिकेमध्ये गेल्या बाजारी गेल्या आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या हाताखालचे सर्व अधिकारी हे त्यांना गुंडाळूनच काम करत होते ....परंतु नवआयुक्त सुनील पवार साहेबांनी याच्यावर अंकुश ठेवावा..... कोण आपला. कोण परका. न पाहता सांगलीकरांना एक चांगली सेवा देण्याची संधी सुनील पवार यांच्या माध्यमातून सांगलीकर यांना मिळालेली आहे ...त्यांनी पूर्णतः लक्ष देऊन सांगलीकरांना योग्य न्याय द्यावा ...अशी सर्वसाधारण व माफक करदात्या नागरिकांची मागणी आहे...


 गेल्या आयुक्तांनी चमकोगिरी केल्याशिवाय काहीही केलेले नाही.... आज रस्ता व खड्ड्यांची परिस्थिती बघितली, गाढव ,कुत्रे ,व जनावरे रस्त्यावर आलेले आहेत, सांगलीच्या उशाला कृष्णा नदी असताना सांगलीच्या राधाकृष्ण वसाहत, शाहू उद्यान व पत्रकार नगर मध्ये आपल्या वाटर वर्क्स कडून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची कायमची बोंब आहे ...या अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात... का तर त्यांना व्यवस्थित पगार चालू आहे. .... पण ते हे सगळे अधिकारी जनतेच्या पैशातूनच पगार घेतात हे सर्वसाधारणपणे व सोईस्करपणे विसरून गेल्याच दिसत आहे त्यामुळे त्यांंंं वॉटरवरच्या अधिकाऱ्यांना कोणतेही जनतेच्या नागरिकांच्या प्रश्नाबद्दल देणे घेणे नाही. . आज परिस्थिती बघितली ,तर ही खालचे अधिकारी आयुक्तांना गुंडाळून काम करत असतात ...ते आंबोळे सारख्या अधिकाऱ्याला आयुक्ता पेक्षा जास्त पगार असल्याचे कळून येते....


 त्यामुळे ते कोणाला जुमानतच नाहीत... प्रत्येक भागात हिंस्र कुत्री वेगवेगळ्या जनावरावर हल्ला करून फाडून खात आहेत, एखाद्या मानवावर किंवा मुलावर ,वृद्धावर हल्ला करून खाल्ल तर त्यास ही आयुक्त किंवा हे अधिकारी जबाबदार राहणार आहेत का?? तर लोकसंदेशच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना असे सूचित करू इच्छितो की..... आयुक्तांनी मागच्याच आयुक्तासारखे चमकोगिरी न करता सांगलीतील ज्या सर्वसाधारण व गरीब नागरिकांसाठी खरंच व कामाच्या त्यांच्या फायद्याच्या सुविधा आहेत.  त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे... नाहीतर" येरे माझ्या मागल्या" असेच चमकोगिरी करण्यासाठी आपल्याला बरेच माध्यम आहेत ... मी कसे काम करतो हे दाखवण्यासाठी मीडियाचा वापर करू नका.... काम करून त्याच्यातून लोकांना न्याय द्या.   ....अशी सर्वसाधारण नागरिकांच्यातून बोलले जात आहे.... आयुक्तसाहेब आपल्या खालचे अधिकारी वरिष्ठांना व महापौरांना समोरच्याला कसे गुंडाळायचं याचं त्यांनी या दहा वर्षात  सांगलीमध्ये ट्रेनिंगच घेतलेल आहे...  . आयुक्त असतील , महापौर असतील त्यांना गुंडाळायचं काम या अधिकाऱ्यानी केले त्यांच्यावर कोणताही दंडुका अंकुश,वचक धाक, राहिलेला नसल्याने हे खालचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत, निदान सांगलीकरांना आपल्या माध्यमातून एक चांगला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो. ... 
 संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सांगली

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली