SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली: शिवसेना पक्षप्रमुख मान.उद्धवजी ठाकरे यांनी कुपवाड शहर प्रमूखपदी सुरेश साखळकर यांची निवड केली जाहीर ....
कुपवाड : ता.23. काल मुंबई येथे मातोश्री वर झालेल्या सांगली आढावा बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कुपवाड शहरांला कर्तृत्वान युवा चेहरा देऊन अनुभवी संघटण कौशल्य असणारा युवा नेता मा सुरेश साखळकर यांची कुपवाड शहर प्रमुख म्हणून निवड जाहीर केली.त्या निमित्त चंदनदादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष व उपाध्यक्ष बाबासाहेब सपकाळ शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य.व मनपा अध्यक्ष महेश मासाळ ,उद्योजक विजय वाक्षे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीसाठी संपर्क प्रमुख मा प्रा नितीनजी बानुगडे पाटील यांचेकडे जिल्हा प्रमुख मा संजयजी विभुते बापू, उप जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर व प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यांच्या नावाला सर्वांनुमते संमती देण्यात आली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली