BID
लोकसंदेश प्रतिनिधी : संभाजी गोसावी
मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे शिवसंग्रामचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटें यांच्यावर दुपारी चार वाजता शोकाकूल वातावरणांमध्ये जड अंतकरणांने सांश्रू नरयांनी अखेरचा निरोप देण्यांत आला. पुत्र आशितोष मेटे यांनी त्यांच्या पार्थिंवाला भडांगणी दिला.
लोकनायकाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरी कोसळत असतानाही हजारो संख्येने जनसामुदाय उपस्थित होता. शोक भावना व्यक्त करताना अनेक मान्यवरांना गहिवरुन आले. मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रंश्नी मंत्रालयांत आयोजित बैठकीला जात असताना पुणे मुंबई द्रतगती पुणे मुंबई मार्गावर दिनांक १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधंन झाले. त्यांच्या अचानक जाण्यांने संपूर्ण महाराष्ट्रांसह बीड जिल्ह्यांवर शिवकाळ पसरली सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले व मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे लढाऊ बनण्यांचे नेतृत्व म्हणून विनायक मेटे यांची चांगलीच ओळख होती. शिवसंग्रामांची स्थापना करून त्यांनी राज्यभर संघटन बांधणी केली होती.
लोकप्रिय आमदार एक वादळी नेते म्हणून त्यांची विधानपरिषद पाच वेळा सदस्यपद भूषवून आपली कारकीर्द गाजवली होती. ( मेटेंची समाजासाठी लढण्याची धडपड) अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की मेटेचा अपघात झाल्यांची माहिती समजताच मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तातडीने निघालो, मनाला न पटणारी घटना घडली काही माणसं कुटुंबापूरर्ती मर्यादित नसतात तर त्यांची समाजासाठी काहीतरी करण्यांची तळमळ असते. तीच तळमळ विनायक मेटेची होती.
मराठा समाजांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अविरत लढा दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनायक मेटे संवेदनशील नेते होते अशी भावना व्यक्त केली. मेटेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती यांच्यासह राज्यांतील राजकीय क्षेत्रातील अनेक नेते मंडळी तसेच बीड जिल्ह्यांतील सर्व प्रशासन व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी यावेळी गर्दी होती. विनायक मेटे यांच्या पार्थिंवाला त्यांचे पुत्र आशितोष यांनी भंडाआग्नी दिला यावेळी सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना अगदी गहिवरुन आले यावेळी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे नी अपघात कसा घडला हे कळले पाहिजे, याबाबत चौकशी झाली पाहिजे त्यांनी अंत्यसंस्कारावेळी हंबरडा फोडला.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या जाण्यांने संपूर्ण महाराष्ट्रांवरच नव्हे तर राजकीय वर्तुळात एक लाडका लोकप्रिय आणि समाजासाठी अहोरात्र लढा देणारा नेता आज गमावला ही मोठी दुःखाची पोकळी निर्माण झाली.असा तडफदार नेता आज महाराष्ट्रांने गमावला या त्यांच्या कुटुंबियांना या दुःखांतून सावरण्यांचे बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना अशा शब्दात सातारांचे पत्रकार श्री. गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई