आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल,

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल,



MUMBAI 

आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल, 

क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे देश असणाऱ्या आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) लवकरच पार पडणार अशी माहिती समोर येत होती.पण आता नुकतंच या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 


बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून बीसीसीआयने देखील जय याचं ट्वीट पोस्ट केलं आहे.  27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
 

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहू या...



     लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई