SANGLI
सांगली : दुधाळ जनावरांच्या वाटपासाठी पुरवठादार नेमणूकीकरिता 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 8: सन २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण व इतर योजनांतर्गत दुधाळ जनावरांच्या (गायी-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पुरवठादारांनी आपले अर्ज दि. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज) येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे.
पुरवठादार व्यक्ती/ संस्था /कंपनी / फार्म यांच्याकडे कृषि उत्पन्न बाजार समितीचा जनावरांच्या बाजाराचा परवाना असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधितास जनावरे खरेदी-विक्रीचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना मागील तीन वर्षांमध्ये किती दुधाळ जनावरांची खरेदी केली आहे याबाबतची कागदपत्रे व कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्रीचे अधिकृत आकडे सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यकता भासल्यास इतर राज्यामधून दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास करावी लागणार आहे व त्याचा खर्च पुरवठादाराने स्वतः करावयाचा आहे. अर्जाचा नमुना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली कार्यालय, सहायक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, मिरज, सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सांगली/ इस्लामपूर/ तासगाव/ कवठेमहांकाळ/ विटा आणि पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती (सर्व जि.सांगली) यांच्याकडे देण्यात आलेला असल्याचे डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली