RATNAGIRI
लोकसंदेश प्रतिनिधी रत्नागिरी
महाराष्ट्राचा अपमान करणा-या राज्यपाल कोशारी ह्यांना रत्नागिरी जिल्ह्यात फिरू देणार नाही... शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी
मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला आहे , त्याचा शिवसेना लांजा तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी मत मांडले.
भगतसिंग कोशारी तुमच्या माहितीसाठी सांगतो- महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. गुजरात, राजस्थानच नव्हे तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात मराठी मनगटाचा आणि मुत्सद्देगिरीचा दबदबा होता. मुंबई निर्माणासाठी इथल्या मराठी माणसांनी आपलं रक्त सांडलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही तुम्हाला माहीत नसेल तर माहिती घ्यावी आणि ज्यांना कोणाला मुंबई सोडून जायची असेल त्यांनी तू खुशाल सोडून जावी आम्ही आमची मुंबई सांभाळायला समर्थ आहोत. अजून ही आपण आपले बोलणे बंद नाही केलेत तर ...पक्षप्रमुखानी सांगितल्या प्रमाणे जोड्याने मारू अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली