MUMBAI : महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने बऱ्याच वेळा महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतलेला आहे. .. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने बऱ्याच वेळा महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतलेला आहे. .. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया



मनसे पक्ष प्रमुख... राज ठाकरे...
यांनी आपल्या शैलीत पत्र लिहून निषेध व्यक्त केला...


               कोश्यारींची होशियारी?

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.....

जय महाराष्ट्र !



________________________________

महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने बऱ्याच वेळा महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतलेला आहे. ... परंतु त्यांनी राजस्थान व गुजरात मधील नागरिक इथून निघून गेल्यानंतर मुंबईमध्ये अथवा महाराष्ट्र मध्ये पैसा राहणार नाही असं वक्तव्य केल्यामुळे ...संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केल्यामुळे ....वेगवेगळ्या स्तरातून त्यांच्यावर महाराष्ट्र संतप्त झालेला आहे ... सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया, आपल्या संतप्त भावना, ट्विट व्दारे मांडल्या आहेत ...
________________________________________
_________________________________________



                 युवराज संभाजीराजे छत्रपती....

विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत

त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान @narendramodi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.
________________________________________



               माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी
                          ट्विटरवर . .......

बंद करो होशियारी महाराष्ट्र से भगाओ कोश्यारी #

अशा शब्दात टॅग लाईन लिहून आपला निषेध व्यक्त केला...

________________________________________




                     प्रशांत कदम.... ट्विट.....

राज्यपाल भगतसिंह कोशियारी महात्मा फुले - सावित्रीबाईंबद्दल बोलताना, आत्ता मुंबई बद्दल बोलताना ज्या पद्धतीने हसत होते.. हे हास्य नीट ओळखा.

खूप सनातनी हास्य आहे ते, हजारो वर्षांचं आहे.....
________________________________________




                    एडवोकेट आशिष शेलार.....

मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये !

________________________________________



                 आशिष जाधव. .. ट्विट.....

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जोवर महाराष्ट्र व मराठी जनतेची जाहीर माफी मागत नाहीत किंवा केंद्र सरकार त्यांना हटवत नाही तोवर शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही,असे जाहीर करावे ! नाही तर या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार गमावलेला असेल......!!

_______________________________________



                माजी मंत्री जयंत पाटील..

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे.

_________________________________________



                    राजू परुळेकर... ट्विट


महामहिम राज्यपाल @BSKoshyari जे महाराष्ट्रसंबंधी बोलले ते महाराष्ट्राला अत्यंत अपमानजनक आहे. त्यांचं बोलणं ज्या गुजराती, मारवाड़ी व मराठी बांधवाना खरं वाटत आहे त्यांनी गुजरात व राजस्थान ही आपली राज्यं तत्काळ तिथे स्थलांतरित होऊन श्रीमंत करावीत. सोबत समविचारी मराठींना ही घेऊन जावं.
_______________________________________




              माजी मंत्री अजित पवार.... ट्विट

ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये.
___________________________________________



                  खा. सुप्रिया सुळे ... ट्विट

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे.

___________________________________



           आ. अमोल मिटकरी. ... ट्विट

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय... महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.....

_______________________________________________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई