MUMBAI :
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
देव तारी त्याला कोण मारी. ! 20 व्या मजल्यावरून ढकलूनही महिला बचावली..मुंबई मालाड मधील घटना...
देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण खऱ्या अर्थाने खरी ठरली आहे. मुंबईतील मालाडमध्ये एका महिलेला विसाव्या मजल्यावरून ढकलण्यात आले होते. मात्र या घटनेत महिलेचे प्राण वाचलेत आहेत. अनिता फाले असं या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या काही दिवसांपासून मालाड परिसरात क्राईमच्या अधिक घटना घडत आहेत. गुरुवारी घरकाम करणाऱ्या अनिता फाले या महिलेला इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने इमारतीवरून ढकलून दिले. महिलेचं नशीब चांगलं म्हणून ती या घटनेतून बचावली. अनिता फाले या महिलेचे इमारतीच्या सुरक्षारक्षका सोबत प्रेम संबंध होते. गुरुवारी त्यांचं भांडण झालं होतं. त्याच रागाच्या भरात सुरक्षा रक्षकाने महिलेला इमारतीच्या 20 मजला मधून खाली फेकून दिले. ज्यावेळी महिलेला ढकलण्यात आलं... त्यावेळी त्यांनी ग्रील पकडून ठेवल्याने त्यांचे प्राण वाचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना घडल्यानंतर काही तासात आरोपीने तिथून पळ काढला असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. ज्या वेळी या महिलेला खाली ढकललं, त्यावेळी महिलेनं शिताफीन अठराव्या मजल्यावर एका खिडकीला घट्ट पकडले होते. हा प्रकार तिथल्या एका महिला रहिवाशाच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
इमारतीवरून ढकलून दिले
अनिता या गोरेगाव येथील रहिवासी आहेत. त्या मालाड येथील सोसायटीमध्ये घरकाम करतात. तिथेचं अर्जुन हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. गुरुवारी ज्यावेळी अनिता घरकाम करण्यासाठी इमारतीमध्ये दाखल झाल्या. तसेच त्याचं काम करून त्या दुसऱ्या कामावरती निघाल्या होत्या. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याना दुसरं काम मिळवून देतो असं सांगून विसाव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर त्यांने अनिताचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनिता यांनी तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना विसाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. त्यांनी अठराव्या मजल्यावर एका ग्रीलला पकडल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली