MiRAJ ; हिंगोली जिल्ह्यातील दलित मूलीवर झालेल्या बलात्कार व मृत्यु प्रकरणाचा मिरजेत तीव्र पड़साद: सर्वपक्षीय निषेध ..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MiRAJ ; हिंगोली जिल्ह्यातील दलित मूलीवर झालेल्या बलात्कार व मृत्यु प्रकरणाचा मिरजेत तीव्र पड़साद: सर्वपक्षीय निषेध ..



HINGOLI

हिंगोली जिल्ह्यातील दलित मूलीवर झालेल्या बलात्कार व मृत्यु प्रकरणाचा मिरजेत तीव्र पड़साद: सर्वपक्षीय निषेध ..

दि. २६/०७/२०२२ रोजी मु.पो. महाळशी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे दिक्षा नामक बहूजन (बौद्ध) मुलीस लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक व वारंवार बलात्कार करून विष पाजून विकृत समाजकंटक नराधमाद्वारे हत्याकांड घडवण्यात आले आहे.


या घटनेचा मिरज शहरामधील सर्व समविचारी पक्षानी मिरज प्रांत अधिकारी मा.समिर शिंगटे साहेब यांचे द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सो यांना निवेदन करून तिव्र शब्दामध्ये निषेध नोंदवला.


यावेळी जैलाब शेख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की,सदर घटनेत मृत्यूमूखी झालेल्या मुलीच्या कूटूंबीयांस दोन कोटी रूपये नुकसान भरपाई द्यावी व या कुटूंबीयांच्या संरक्षणा करिता सशस्त्र पोलिस बंदोबस्त शासना कडून नियुक्त करणेत यावा अशी यावेळी मागणी करणेत आली.


योगेंद्र कांबळे म्हणाले, सदर घटनेतील आरोपीवर दलित प्रतिबंधात्मक कायद्यानूसार व योग्य तो गुन्हा दाखल करून जलद गती न्यायलयामध्ये प्रकरण चालवून फाशीची शिक्षा देणेत यावी.अन्यथा महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष संघटना मिळून तीव्र आंदोलन छेडणेत येईल.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सचिव जैलाब शेख, रिपब्लिकन पक्षाचे आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, व्ही.जे.एन.टी.आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनिल माने,आर.पी.आयचे सांगली शहर जिल्हा सचिव प्रमोद वायदंडे,शिव सेनेचे सागर मेटकरी, बहूजन समाजवादी पार्टीचे मिरज शहर अध्यक्ष सलिम अत्तार,कॉंग्रेस पार्टीचे उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सांगली शहर अध्यक्ष याकूब मणेर, मराठा समाजचे मोहन मिसाळ,श्रीकांत यादव,मुकूंद कदम,मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते तौफीक मुजावर,यांचे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली