KOLHAPUR :
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
वडगाव बाजार समिती सचिव आनंदराव पाटील यांचे कार्य उल्लेखनीय -सभापती सुरेश पाटील यांचे गौरव उद्गार
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उल्लेखनीय कामगिरी व प्रगतीमध्ये गेल्या वीस वर्षात संस्थेचे सचिव आनंदराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य असून संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मुळेच वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज प्रगतीचा टप्पा गाटू शकली असे गौरव उद्गार वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांनी काढले
ते वडगाव ता हातकणंगले येथे वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आनंदराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती विलास खानविलकर हे होते. यावेळी सचिव आनंदराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती बद्दल वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील व विलास खानविलकर यांच्या हस्ते आनंदराव पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात अनेक बाजार समित्या तोट्यात चालल्या असुन बंद पडायच्या अवस्थेत आहेत तरी सुद्धा वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दोन वर्षाच्या कोरोणा कालावधीत सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करून आज जिल्ह्यात अग्रक्रमी आहे. हे फक्त कर्मचाऱ्यांच्या विश्वासावरच होऊ शकते असे गौरव उद्गार माजी सभापती विलासरावजी खानविलकर यांनी काढले. यावेळी वडगाव बाजार समिती इचलकरंजी व वडगाव शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आनंदराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्कार प्रसंगी बोलताना वडगाव बाजार समितीमध्ये काम करत असताना अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव आला पण तो अनुभव आयुष्यात जीवन जगताना नक्कीच उपयोगी पडेल असे गौरवोद्गार सत्कारमूर्ती आनंदराव पाटील यांनी काढले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण रावजी पाटील ,वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव पाटील यावेळी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी सर्व सदस्य वडगाव नगरपालिकेचे नगरसेवक व्यापारी तसेच आनंदराव पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी वडगाव परिसरातील विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आनंदराव पाटील यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली