KOLHAPUR हिंगणगाव ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर, आरक्षण कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
हिंगणगाव तालुका हातकलंगले येथील ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत ग्रामपंचायत कार्यालय हिंगणगाव येथे जाहीर करण्यात आली, हिंगणगाव येथे एकूण तीन प्रभाग असून एकूण सदस्य संख्या नऊ आहे,एकूण लोकसंख्या1971 इतके असून एकूण मतदान 1551 इतके आहे
प्रभाग क्रमांक एकचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण पुरुष , प्रभाग क्रमांक दोन आरक्षण सर्वसाधारण स्त्री दोन सर्वसाधारण पुरुष एक , प्रभाग क्रमांक तीन आरक्षण नामाप्रवर्ग एक, सर्वसाधारण स्त्री एक, सर्वसाधारण पुरुष एक असे घोषित झाले आहे
सदर प्रभाग आरक्षणासाठी हातकलंगले सहकार अधिकारी सूर्यकांत मसुरकर, गाव कामगार तलाठी मधुकर कित्तुरे, यांची हातकलंगले तहसीलदार यांच्यावतीने नेमणूक करण्यात आली होती. गाव कामगार तलाठी कित्तूर यांनी केले सदर आरक्षण सोडत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणगाव सरपंच शिला पाटील ह्या होत्या यावेळी ग्रामसेवक विनायक चौगुले, सरपंच शीला पाटील, उपसरपंच अर्चना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर निवडणूक आरक्षण सोडत इकडे मात्र गावातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. हिंगणगावच्या राजकारणात सतत चर्चेत असणारे लोकप्रतिनिधी आरक्षण सोडते मात्र ग्रामपंचायती कार्यालयात येऊ शकले नाहीत याची चर्चा मात्र सर्वत्र होत होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली