KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर ;विनोद शिंगे
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एक गाव एक उमेदवार परंपरा चालू करा ; चेअरमन सुरेश हिंगलजे
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश हिंगलजे व्हाईस चेअरमन पदी शितल कळंत्रे, यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कुंभोज गावचे माजी उपसरपंच धनाजी तिवढे मुनीर सुतार ,सुनील वाडकर, तुषार कोळी, आदी मान्यवरांच्या हस्ते नूतन चेअरमन सुरेश हिंगलजे व्हाईस चेअरमन शितल कळंत्रे यांचा तसेच वडगाव बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल चांद मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.
कुंभोज परिसरातील अनेक सेवा संस्थांच्या निवडणुका अलीकडे बिनविरोध होत असून हीच परंपरा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत अवलंब करावा, तसेच एक गाव एक उमेदवार निवडणुकीचे नियोजन करावे. असे मत नूतन संस्थेचे चेअरमन सुरेश हिंगलजे यांनी बोलताना व्यक्त केले. कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी बिनविरोध परंपरा अंमलात आणल्यास गावचा नक्की विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण प्रयत्न करू असे मत माजी ग्रामपंचायत सदस्यांनी बोलताना वेळी व्यक्त केले.
यावेळी नंदकुमार माळी, कुबेर हराळे ,सुभाष पाटील चंद्रकांत चौगुले ,सुनील वाडकर, धनाजी तिवढे,नंदकुमार माळी, मुनीर सुतार ,कुबेर हराळे, तुषार कोळी ,अरुण माळी, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपडगे, प्रकाश तोरस्कर उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव वडगाव बाजार समितीचे संचालक चांद मुजावर यांनी केले प्रास्ताविक चेअरमन सुरेश हिंगलजे व आभार माजी उपसरपंच सुनील वाडकर यांनी मानले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली