KOLHAPUR ; विश्वकर्मा सुतार समाजाच्या समाज मंदिराची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR ; विश्वकर्मा सुतार समाजाच्या समाज मंदिराची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा....



KOLHAPUR 
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे 

समाज मंदिराची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा....विश्वकर्मा सुतार समाजाच्या मागणीचे प्रांत कार्यालयास निवेदन सादर....


कबनूरमधील विश्वकर्मा सुतार समाजाच्या समाज मंदिराची
तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी ,या मागणीचे निवेदन विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर करण्यात आले.तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी ,अन्यथा विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

कबनूर येथील चंदूर रोडवर असलेल्या सुतार गल्लीत
विश्वकर्मा सुतार समाजाचे समाज मंदिर ३५ वर्षापासून वापरात आहे.मात्र परिसरातील काही समाजकंटकांकडून
23 जुलै रोजी रात्री 1 च्या सुमारास या समाज मंदिराची तोडफोड करण्याचा प्रकार घडला.

यामध्ये समाज मंदिराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित समाजकंटकांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र सदरची तक्रार मागे घेण्यासाठी मोठा दबाव आणत असून धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे सुतार समाजबांधवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.हे समाज मंदिर विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाची अस्मिता आहे. तरी या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात. तरी याची गंभीर दखल घेवून संबंधित समाजकंटकांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी ,या मागणीचे निवेदन विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर करण्यात आले.तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी ,अन्यथा विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.निवेदन सादर करणा-या
शिष्टमंडळात गोपीनाथ सुतार, सोमनाथ सुतार, अर्जुन सुतार ,अलका सुतार, दीपक सुतार, अविनाश सुतार, महेश सुतार आदींसह विश्वकर्मा सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली