KOLHAPUR कुंभोज अर्बन सेवा सोसायटी चेअरमनपदी सुरेश हिंगलजे तर व्हाईस चेअरमनपदी शितल कंळत्रे पर्यंत यांची बिनविरोध निवड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR कुंभोज अर्बन सेवा सोसायटी चेअरमनपदी सुरेश हिंगलजे तर व्हाईस चेअरमनपदी शितल कंळत्रे पर्यंत यांची बिनविरोध निवड




KOLHAPUR 
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे 

कुंभोज अर्बन सेवा सोसायटी चेअरमनपदी सुरेश हिंगलजे तर व्हाईस चेअरमनपदी शितल कंळत्रे पर्यंत यांची बिनविरोध निवड...

कुंभोज तालुका हातकणगले येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेश हिंगलजे व व्हाईस चेअरमन पदी शितल कळंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. परवा झालेली संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालेने नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी संस्था संचालकांच्या बैठकीचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुका निबंधक डॉक्टर प्रगती बागल या होत्या...



          सदर संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सदर संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश हिंगलजे वव्हाईस चेअरमन पदि शीतल कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रगती बागल यांनी केली



      यावेळी नूतन चेअरमन सुरेश हिंगलजे यांचा सत्कार बबन पाटील व व्हाईस चेअरमन शितल कळत्रे यांचा सत्कार माजी चेअरमन रावसाहेब तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रगती बागल व मकसूद शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रोसिडिंग वाचन सचिव चाँद मुजावर यांनी केले. यावेळी संस्थेच्या हितासाठी निवडणुकीतून  माघार घेणारे भरत जमणे यांचा सत्कार चेअरमन सुरेश हिंगलजे व शितल कळत्रे यांच्या हस्ते करण्यात आला ,यावेळी बबन पाटील ,अण्णासो कळंत्रे धनपाल कळंत्रे तसेच संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली