DUBAI
सांगली जिल्ह्यातील जत शहरात राहणारे
शशिकांत उर्फ विजय म्हमाने दुबईत नोकरीसाठी अभियंता म्हणून दुबई येथे स्थायिक झाले होते .
दुबई मध्ये सुट्टीच्या दिवशी त्यांचें कुटुंब व मित्रांसह समुद्र किनारी पर्यटनासाठी गेले होते
अत्यंत आनंदी उत्साही व वातावरणामध्ये सहलीसाठी. निघाल्याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ओमान येथील सलालाह समुद्रकिनारी प्रचंड लाटा उसळत असताना त्याठिकाणी हे सर्वजण समुद्रस्नानाचा आनंद घेत होते. अचानक एक मोठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.
शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेला जत येथील त्यांचे बंधू वकील राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.
घटना रविवारी घडली. गेल्या तीन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यांत्रिकी अभियंता आहेत. अनेक वर्षे ते संयुक्त अरब अमिरातीमधील विविध कंपन्यांमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत. यामुळे कुटुंबासह ते दुबईमध्येच स्थायिक झाले आहेत. रविवारी ईदच्या सुटीनिमित्त ते पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य काही मित्रांसोबत पर्यटनासाठी दुबईपासून जवळच असलेल्या ओमान येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.
या दुर्घटनेचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक ओपन करा...
https://youtu.be/7n5kO4YyddY
बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे ओमानच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याची वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली