सांगली लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.
सांगली : डॉक्टर दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सत्कार करीत त्यांना डॉक्टर दिनाच्या
दिल्या शुभेच्छा ...
सर्वत्र डॉक्टर दिन साजरा होत असताना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पहिल्यांदाच महापालिकेच्या दवाखान्यात आणि आरोग्य वर्धिनी केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा यानिमित्त सन्मान केला.
यावेळी उपायुक्त चंद्रकांत आडके, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे , आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांच्यासह मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक डॉक्टरांनी आपले अनुभव आणि मनोगते यावेळी कथन केली.
तसेच आपल्या डॉक्टर क्षेत्रातील कारकिर्दीची माहिती सर्वाना दिली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देत कोविड काळात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच यापुढच्या काळात सुद्धा उत्कृष्ठ रुग्णसेवा करावी असा शुभेच्छा ही दिल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली