सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न फसला... स्वतःला कारमध्ये पेटवून घेत पत्नी आणि मुलाला जाळले...
नागपूरःआर्थिक अडचणीतून कमालीच्या नैराश्यात गेलेल्या उद्योजकाने स्वत:ला पेटवून घेतले आणि पत्नी व मुलाला कारमध्येच जाळले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला; तर पत्नी आणि मुलगा हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. वर्धा मार्गावरील खापरी पुनर्वसन परिसरात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.
रामराज गोपालकृष्ण भट (वय ६३), असे मृताचे तर त्यांच्या पत्नी संगीता (५७) व मुलगा नंदन (३०), असे मायलेकाचे नाव आहे. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रामराज यांची एम.आय.डी.सी. भागात त्यांची नटबोल्ट बनवण्याची कंपनी असून अनेक दिवसांपासून ती बंद होती, कोरोना काळात आलेल्या व्यवसाय मंदीतून रामराज भट्ट हे निराश होते, संगीता या गृहिणी, तर नंदन हा अभियंता आहे. तो शेअर ट्रेडिंग करतो. तीन वर्षांपासून रामराज यांना आर्थिक अडचणी येत होत्या. त्या तणावातून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा...
आत्महत्येपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहल्या होत्या
रामराज यांनी आत्महत्येपूर्वी आर्थिक अडचणीतून कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे .. स्वत:ला आग लावण्यापूर्वी त्यांनी ही चिठ्ठी कारमधून बाहेर फेकली होती बेलतरोडी पोलिसांना ती आढळली असता सविस्तर चिठ्ठी माझ्या घरातील कपाटात आहे, असे या चिठ्ठीत नमूद केलेलं होत ...
पोलिसांनी भट यांच्या घरातील कपाटातून ही दुसरीही चिठ्ठी जप्त केली. यातही त्यांनी आर्थिक अडचणीतून आत्महत्या करीत असल्याचे इंग्रजीत नमूद केलं आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई